आयुर्वेदाला परदेशात मोठ्या संधी उपलब्ध -डॉ. कुशाग्र बेंडाळे

Date:

पुणे : “औषधविरहित (मेडिसिन लेस) उपचारांना परदेशात मोठी मागणी आहे. अशी उपचारपद्धती केवळ आयुर्वेद देऊ शकते. त्यामुळे जगभर आयुर्वेदात प्रॅक्टिस करणाऱ्यांसाठी मोठ्या संधी उपलब्ध आहेत. त्यामध्ये सल्ला व मार्गदर्शन, पंचकर्म, संशोधन आदी गोष्टींचा समावेश आहे. परदेशात योग आणि आयुर्वेदाला अधिक पसंती दिली जात आहे. त्यामुळे आपल्याला तेथे या क्षेत्रात काम करण्यासाठी मोठा वाव आहे,” असे मत ऑस्ट्रेलिया येथील आंतरराष्ट्रीय आयुर्वेद प्रॅक्टिशनर डॉ. कुशाग्र बेंडाळे यांनी व्यक्त केले.

पुण्यातील केशायुर्वेद या पहिल्या आयुर्वेदीय हेअर टेस्टिंग लॅब अँड रिसर्च सेंटरतर्फे आयोजित ‘आयुर्वेदाला असलेल्या परदेशातील संधी’ या विषयावरील एकदिवसीय सेमिनारमध्ये डॉ. बेंडाळे बोलत होते. सेनापती बापट रस्त्यावरील मेरिडियन प्लाझा येथे झालेल्या या सेमिनारवेळी केशायुर्वेदचे प्रमुख डॉ. हरीश पाटणकर, डॉ. स्नेहल पाटणकर आदी उपस्थित होते. डॉ. बेंडाळे गेल्या ९ वर्षांपासून ऑस्ट्रेलियामध्ये आयुर्वेदाची प्रॅक्टिस करीत आहेत. वर्षभरापूर्वी त्यांनी मान्यताप्राप्त केशायुर्वेदची शाखाही सुरु केली.
डॉ. कुशाग्र बेंडाळे म्हणाले, “बाहेरच्या देशात आपण आयुर्वेद पोहचवू शकतो, ही जिद्द आणि विश्वास आपल्याला पुढे नेते. आपल्या शास्त्राबदल बाहेरचे लोक येऊन सांगतात, ‘ते खूप छान आहे’. मग हे आपण त्यांच्यापर्यंत का पोहचू नये. आयुर्वेदाच्या ज्ञानाचा प्रसार तेथे करण्याची गरज आहे. लवकरच १० ते १५ मूला-मुलींचा एक गट ऑस्ट्रेलियात घेऊन जाणार असून, ते आपापल्या क्षेत्राप्रमाणे तिथे काही दिवस काम करतील. विदेशात काम करताना काय अडचणी येतील, याचा अंदाज त्यांना येईल.”

डॉ. हरीश पाटणकर म्हणाले, “फक्त भारतातील आयुर्वेदाचे ज्ञान मिळवण्याची जिद्द ठेवाच. त्याचबरोबर विदेशातही जाऊन तेथील त्यांचे आयुर्वेदाचे नवनवीन पद्धती जाणून घेणेही महत्वाचे आहे. आपण नाश पाऊ शकतो, पण आयुर्वेद नाही. म्हणून आपल्यानंतर आपल्या मागे आयुर्वेद राहावे, याचा प्रयत्न केला पाहिजे. आयुष्यात एकदा तरी विदेशात जाण्याचे ध्येय ठेवा. जिद्द, इच्छाशक्ती आणि प्रयत्न असेल, तर तुमचे स्वप्न नक्की पूर्ण होतात.”

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

मोबाईल ॲपद्वारे गर्भलिंग निदान केल्याचा प्रकार उघड

पुणे, दि. 4 मार्च: गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व निदान तंत्रे...

राज्यसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाचा ज्येष्ठ नेते शरद पवार यांना पाठिंबा: हर्षवर्धन सपकाळ

मुंबई, दि. ४ मार्च २०२६.राज्यसभेच्या सात जागांसाठी निवडणूक होत...

श्री रसिकलाल धारीवाल यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ९वे वार्षिक रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न

पुणे- आर. एम. धारीवाल फाउंडेशन तर्फे समाजसेवेची अखंड परंपरा...

मुळा-मुठा नदी प्रदूषणाविरोधात ‘एमआयटी’च्या विद्यार्थ्यांचा एल्गार

नदीपात्रात अवैध कचरा टाकण्याविरोधात विद्यापीठ प्रवेशद्वारावर आंदोलन; आगी व...