मनोज जोशी, वसंत नगरकर यांना ‘युवा’ पुरस्कार

Date:

पुणे : शुक्ल यजुर्वेदिय माध्यंदिन महाराष्ट्रीय ब्राह्मण मध्यवर्ती मंडळाच्या याज्ञवल्क्य उद्योजक विकास अभियानाच्या (युवा) दहाव्या वर्धापन दिनानिमित्त चंद्रकांत जोशी यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा ’युवा उद्योजक पुरस्कार’ श्रीपाद शंकर नगरकर सराफ पेढीचे वसंत नगरकर आणि सृजन आर्ट गॅलरी पुरस्कृत ’सृजन युवा पुरस्कार’ अभिनेते पद्मश्री मनोज जोशी यांना, तर ‘कै. दिगंबर सर्वोत्तम कर्जतकर पुरस्कार’ यंदा ज्येष्ठ कार्यकर्ते अनिल पाठक आणि ज्ञानेश्वर त्रैमासिकाचे माजी संपादक रामचंद्र कुलकर्णी यांना जाहीर झाला आहे, अशी माहिती संस्थेच्या मंजुषा वैद्य, श्रीकांत जोशी यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी अजय कुलकर्णी, जयंत कुलकर्णी आदी उपस्थित होते.

हा ‘युवा’ पुरस्कार वितरण सोहळा येत्या शनिवारी (दि. २० ऑक्टोबर २०१८) सायंकाळी ५.३० वाजता म्हात्रे पुलाजवळील शुभारंभ लॉन्स येथे होणार आहे. या सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्य सहकारी परिषदेचे अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) शेखर चरेगावकर व पितांबरी प्रॉडक्ट्सचे रवींद्र प्रभुदेसाई उपस्थित राहणार आहेत. याशिवाय प्रसिद्ध निवेदक आणि अभिनेते राहुल सोलापूरकर, बडवे इंजिनिअरिंगचे व्यवस्थापकीय संचालक श्रीकांत बडवे, सिटी कॉर्पोरेशनचे अनिरुद्ध देशपांडे, अभि ग्रुप ऑफ कंपनीजचे जितेंद्र जोशी, आमदार प्रा. मेधा कुलकर्णी, शुक्ल यजुर्वेदिय माध्यंदिन महाराष्ट्रीय ब्राह्मण मध्यवर्ती मंडळाचे उमाकांत जोशी, कार्याध्यक्ष विश्राम कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पाइपलाइन गॅस व सीएनजी वितरणासाठी केंद्र सरकारचा नवा आदेश: विना अडथळा खोदकाम करता येणार

पुणे : केंद्र सरकारने देशभरात नैसर्गिक गॅस व पेट्रोलियम...

पुण्यात ४२४ प्रकरणांत गंभीर फेरफार अनियमितता:महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमातील ‘कलम १५५’ चा गैरवापर

दोषींवर निलंबनासह कठोर कारवाईचे महसूल मंत्री बावनकुळे यांचे निर्देश जबाबदार...

हिंदवी स्वराज्य शपथभूमी श्री क्षेत्र रायरेश्वर येथे विशेष सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात संपन्न

शाहिरी-गायन-वादन सादरीकरणातून स्वराज्य संकल्पनेचा जागर पुणे, दि. २६ मार्च :महाराष्ट्र...

शिवसृष्टी प्रकल्पासह शहराच्या मूलभूत प्रश्नांवर ठोस भूमिका – नगरसेवक हर्षवर्धन मानकर

पुणे महानगरपालिकेच्या सन २०२६–२७ च्या अंदाजपत्रकावर झालेल्या चर्चेदरम्यान नगरसेवक...