सीएसआर : भारतातील सद्यस्थिती’वर राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

Date:

पुणे : “भारतातील उद्योजकांनी आपल्या नफ्यातील काही भाग समाजाच्या हितासाठी वापरावा, याकरीता महात्मा गांधी यांनी पुढाकार घेतला. गांधी हे भारतातील ‘सीएसआर’चे प्रणेते आहेत. ‘सीएसआर’च्या माध्यमातून होत असलेल्या समाजपयोगी उपक्रमात टाटा उद्योग समूहाचे मोठे योगदान आहे. आज देशातील अनेक कंपन्या ‘सीएसआर’ निधीच्या माध्यमातून समाजाच्या विकासासाठी पुढे येत आहेत. आरोग्य, शिक्षण, महिला सक्षमीकरण, स्वच्छता अशा विविध प्रकारच्या उपक्रमात भारतात ‘सीएसआर’ मोठ्या प्रमाणावर योगदान देत आहे, ही देशाच्या विकासासाठी महत्वाची बाब आहे,” असे मत आंतरराष्ट्रीय रिटेल मार्केटमधील रिटेल ऑपरेशन्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित सावरकर यांनी व्यक्त केले.

तर ‘सीएसआर’च्या निधीचा विनियोग हा समाजातील गरजू आणि पात्र लोकांसाठीच व्हायला हवा. तसेच उद्योगांकडून दिल्या जाणाऱ्या ‘सीएसआर’ निधीचे मूल्यांकनही व्हायला हवे, असे मत सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय चोरडिया यांनी व्यक्त केले. सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या सूर्यदत्ता इन्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट अँड टेक्नॉलॉजीमध्ये (एसआयबीएमटी) आयोजित ‘सीएसआर : भारतातील सद्यस्थिती’ या विषयावरील राष्ट्रीय परिषदेत अभिजित सावरकर बोलत होते. प्रसंगी वनराईचे अध्यक्ष रवींद्र धारिया, राउंड ग्लास ऑर्गनायझेशनचे प्रमुख धवल मोदी, डॉ. संजय चोरडिया, कावेरी महाविद्यालयातील विभागप्रमुख डॉ. श्वेता बापट, सूर्यदत्ता इन्स्टिट्यूट ऑफ मीडिया अँड मास कम्युनिकेशन्स रिसर्च हेड डॉ. धनंजय अवसरीकर यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. या परिषदेला प्राध्यापक, विद्यार्थी व विविध क्षेत्रातील मंडळी उपस्थित होती.

अभिजित सावरकर म्हणाले, “उद्योगातील नफा आणि त्याचा समाजासाठी विनियोग याचा ताळमेळ घालता आला पाहिजे. ‘सीएसआर’साठी अनेक देश पुढाकार घेत आहेत. भारतातही अनेक उद्योग ‘सीएसआर’च्या माध्यमातून भरीव काम करीत आहेत. आरोग्य, शिक्षण, पर्यावरण यासह सामाजिक उपक्रमात ‘सीएसआर’ मोठ्या प्रमाणात वापरला जात आहे. ‘सीएसआर’सह पर्सनल सोशल रिस्पॉन्सिबिलिटी’ आपण समजून घेतली पाहिजे. प्रत्येकाने देशाच्या विकासात आपले योगदान दिले पाहिजे.”

रवींद्र धारिया म्हणाले, “वनराईमार्फत ‘सीएसआर’ निधीतून अनेक उपक्रम राबवले जात आहेत. जलसंधारण, पर्यावरणाचा ऱ्हास, विजेची टंचाई आणि कचरा व्यवस्थापन यामध्ये मोठे काम व्हायला हवे. हिंदुस्थान युनिलिव्हर, टाटा, झव्हेरी ऍग्रो यासह इतर अनेक बड्या कंपन्या वनराईशी ‘सीएसआर’मुळे जोडल्या आहेत. वनराईमध्ये वेळ, विश्वास, ठेवी, पारदर्शकता, कार्य, चिकाटी, कौशल्य, तत्रंज्ञान, आणि कृतज्ञता या गोष्टींना आम्ही प्राधान्य देतो.”

डॉ. संजय चोरडिया म्हणाले, “विद्यार्थ्यांतील उद्यमशीलतेला वाव देण्यासह त्यांच्यात सामाजिक बांधिलकीची जाणीव निर्माण करण्याचे कार्य सूर्यदत्ता करत आहे. विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करण्याबरोबरच त्यांच्यात संवेदनशीलताही तेवत ठेवणे महत्वाचे आहे. त्यादृष्टीने उच्च दर्जाचे संशोधनपर शिक्षण, तज्ञ मार्गदर्शन विद्यार्थ्यांना पुरवले जाते. सूर्यदत्ता इन्स्टिट्यूट देखील अनेक सामाजिक उपक्रमांत सहभागी होऊन विद्यार्थ्यांना ‘सीएसआर’चे महत्व पटवून देते.”

डॉ. धवल मोदी यांनी ‘सीएसआर’ संदर्भातील संरक्षण, नवकल्पना आणि विस्तार याविषयी माहिती दिली. विद्यार्थ्यांना स्वयंसेवी संस्था किंवा विविध कंपन्यांमध्ये ‘सीएसआर’ प्रकल्प घेण्याबाबत मार्गदर्शन केले. डॉ. श्वेता बापट यांनी शाश्वत विकासातील ‘सीएसआर’चे महत्व स्पष्ट केले. डॉ. धनंजय अवसरीकर यांनी ‘सीएसआर’च्या कायदेशीर बाबींविषयी माहिती दिली. डॉ. श्रीप्रकाश सोनी यांनी आभार मानले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

रायफल शूटिंगमध्ये अप्रतिम आशिष ढेंगे यांची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

पुणे- इयत्ता सहावीमध्ये शिक्षण घेत असलेला विद्यार्थी अप्रतिम आशिष ढेंगे...

मुसळधार पावसाने दुबई ची तुंबई….विमानोड्डाणं रद्द…..प्रवाशी अडकले….

दुबईला गेलेले भाजपा प्रवक्ते संदीप खर्डेकर म्हणाले .... पुणे- गेली...

‘मी’पणाचा अहंकारच पर्यावरणासाठी घातक:आचार्य प्रशांत यांचे प्रतिपादन

पुणे : 'अहंकार आणि आंतरिक अज्ञान हेच हवामान बदलांसारख्या...

अटलजींमुळे विकसित भारताची संकल्पना – विनोद तावडे

पुणे पुस्तक महोत्सवात विनोद तावडे यांच्या हस्ते 'अटलजी एक...