महाराष्ट्रीयन पदार्थांच्या लोकप्रियतेसाठी ‘अंगतपंगत’

Date:

मराठी शेफ मधुरा बाचल यांचा पुढाकार; सुगरणींच्या 100 मिसळींची मेजवानी

पुणे : साऊथ इंडियन, पंजाबी, नॉर्थ इंडियन, चायनीज आणि फास्ट-जंक फूडच्या जमान्यात महाराष्ट्रीयन पदार्थांना म्हणावी तशी उपलब्धी मिळत नाही. अनेक हॉटेल्स महाराष्ट्रीयन पदार्थांना दुय्यम स्थान देतात. अशावेळी स्वादिष्ट, पोषक महाराष्ट्रीय पदार्थ सगळीकडे उपलब्ध व्हावेत, या हेतूने प्रसिद्ध मराठी शेफ मधुरा बाचल यांच्या पुढाकारातून ‘अंगतपंगत दिवस’ हा उपक्रम राबविला जात आहे. याच निमित्ताने शुक्रवारी पुण्यातील शंकर शेठ रस्त्यावरील कुमार पॅसिफिक मॉलमध्ये असलेल्या इन ग्रीन या हॉटेलमध्ये ‘अंगतपंगत दिवस’ साजरा झाला. मधुरा बाचल यांचे चाहते असलेल्या पुण्यातील 100 पेक्षा अधिक सुगरणींनी खास मिसळीचा बेत बनवला होता. या सर्वांनी एकत्र येत पंगत धरली आणि एकमेकांच्या मिसळीचा स्वादही अनुभवला. जोडीला मधुरासोबत सेल्फी आणि त्यांच्या खमंग टिप्स ऐकून पुणेकर सुगरणींचा आनंद गगनात मावेनासा झाला होता.

‘मधुराज रेसिपीच्या मधुरा बाचल आणि क्यूकी अ‍ॅड्स यांनी संयुक्तपणे या अंगतपंगत दिवसाचे आयोजन केले होते. विविध प्रकारच्या मिसळ तयार करण्यासाठी 100 हुन अधिक चाहत्यांनी इनग्रीन हॉटेलच्या किचनमध्ये गर्दी केली होती. या 100 मिसळींमध्ये मधुरा यांनी बनवलेल्या विशेष मसालांचा वापर केला होता. तोंडाला पाणी आणणार्‍या या पुणेकरांच्या शंभर मिसळींचे प्रदर्शनही मांडण्यात आले होते. महाराष्ट्रातील मराठवाडा, खान्देशी, वैदर्भीय, कोकणी, पुणेरी, कोल्हापुरी अशा वैशिष्ट्यांचे हजारो पदार्थ आहेत. त्यांची चव सगळीकडे उपलब्ध व्हावी, याकरिता या पदार्थांना प्रसिद्धी आणि प्रोत्साहन मिळणे गरजेचे आहे. यासाठीच हा ‘अंगतपंगत’ उपक्रम असल्याचे मधुरा यांनी नमूद केले. अनेक महिलांनीही महाराष्ट्रीयन पदार्थांच्या लोकप्रियतेसाठीच्या कल्पना सांगितल्या.

अंगतपंगतच्या यशाविषयी बोलताना मधुरा बाचल म्हणाल्या, “पाककला हा माझ्या अगदी मनाला भावनारा विषय आहे. त्याच्याच प्रेमातून हे मसाले बनले आहेत. मिसळ हा पदार्थ अतिशय चटकदार आणि जीभेवर रेंगाळणारा आहे. त्यामुळेच आजच्या दिवसाचे सेलिब्रेशन करण्यासाठी मिसळीची निवड केली आहे. महाराष्ट्रातील आणि महाराष्ट्राबाहेरील अनेक हॉटेलांमध्ये महाराष्ट्रीयन खाद्यपदार्थ उपलब्ध करुन देण्याविषयी प्रयत्न करीत आहोत. देशाच्या विविध भागात महाराष्ट्रीयन पदार्थांबाबत जागृती करुन खाण्यासाठी, बनविण्यासाठी आणि त्यावर प्रेम करण्यासाठी मधुराज रेसीपी काम करत आहे.”

क्युकी अ‍ॅड्सचे व्यवस्थापकीय संचालक समीर बांगरा म्हणाले, “मधुरा बाचल अतिशय हुशार आणि उत्साही शेफ आहे. पारंपरिक आणि आधुनिकतेचा मेळ घालत तिच्या चाहत्यांना पिढ्यानपिढ्या लक्षात राहतील अशा रेसीपीज तिला बनवायच्या आहेत. अंगतपंगत हा अतिशय नाविन्यपूर्ण उपक्रम असून, लोकांचा प्रतिसाद मोठा आहे.”

मधुरा बाचल यांच्याविषयी : 
मधुरा बाचल या प्रसिद्ध मराठी शेफ आहेत. मधुराज रेसीपी या नावाने त्यांचे युट्यूब चॅनेल असून, त्याला 19 लाखांपेक्षा अधिक सबस्क्राईबर्स आहेत. मुळच्या पुण्याच्या असलेल्या मधुरा यांचा पाककलेविषयीचा चॅनेल भारतातील क्रमांक एकचा असून, मराठीमध्ये लोकप्रिय आहे. त्यांच्या रेसिपी अतिशय चविष्ट आणि इंटरनेटवर हिट ठरलेल्या आहेत. भारतासह अमेरिका, कॅनडा यांसारख्या देशांमध्ये त्यांचे चाहते आहेत.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

मुंबई प्रमाणे पुण्यातही 500 चौ. फू . घराला मिळकत कर शून्य करा- स्थायी च्या पहिल्या बैठकीत कॉँग्रेस चा प्रस्ताव

ऐतिहासिक निर्णयाबाबतचा चेंडू आता अध्यक्ष श्रीनाथ भिमालेंच्या मैदानात...

सोलर एनर्जी प्रकल्प वापरणाऱ्यांना मिळकत करात 10 टक्के सवलत द्या – दुधाने आणि मानकर यांचा प्रस्ताव

पुणे-सोलर एनर्जी प्रकल्प, म्हणजेच सूर्यप्रकाशाद्वारे वीज निर्मिती करण्याचा प्रकल्प...

प्रदूषणाने कॅन्सर; महाराष्ट्र सरकारची कबुली, 57% रुग्णांचे फुफ्फुस ‘आजारी’, राज्य सरकारच्या अभ्यासात मोठा खुलासा

बांधकामांच्या ठिकाणचे धुळीचे लोट रोखण्यासाठी मोहीम ही देवेंद्र फडणविसांची...