‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’वर मोफत मार्गदर्शन

Date:

पुणे : “महाराष्ट्रासह देशातील अनेक भागात दुष्काळाचे भीषण संकट ओढावले आहे. यंदाच्या या दुष्काळाला सामोरे जाण्यासाठी आणि भविष्यातील पाणी टंचाईवर उपाय करण्यासाठी रेन वॉटर हार्वेस्टिंग करणे गरजेचे आहे. याबाबत जनजागृती करण्यासाठी लायन्स क्लब ऑफ पुणे मैत्रीच्या वतीने शुक्रवार, दि. १० मे २०१९ रोजी सायंकाळी ५.०० वाजता टिळक रस्त्यावरील हिराबाग चौकातील जोत्स्ना भोळे सभागृहात मोफत मार्गदर्शन सत्राचे आयोजन केले आहे,” अशी माहिती लायन्स क्लबचे डिस्ट्रिक्ट चेअरपर्सन (ओरिएन्टेशन) आनंद आंबेकर, लायन्स क्लब ऑफ पुणे मैत्रीच्या मेघना शिंदे, संगीता झंवर व अनिता नेवे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
मेघना शिंदे म्हणाल्या, “लायन्स क्लब ऑफ पुणे मैत्रीच्या सभासदांनी भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा विभाग, पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली हे मार्गदर्शन सत्र आयोजिले आहे. भूजल विभागाच्या वरिष्ठ भूगर्भ तज्ज्ञांकडून शास्त्रशुद्ध पद्धतीने रेन वॉटर हार्वेस्टिंग करण्यासाठी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. डॉ. सतीश उमरीकर अणि डॉ. भाग्यश्री मक्तेवार हे मार्गदर्शन करणार आहे. यावेळी उद्घाटक म्हणून प्रांतपाल रमेश शहा, तर प्रमुख पाहुणे म्हणून उपप्रांतपाल ओमप्रकाश पेठे असणार आहेत. या माध्यमातून आपण आपल्या मृत अवस्थेतील बोअरवेल जिवंत करू शकतो. तसेच टँकरमुक्त सोसायटी करू शकतो. नागरिक व सहकारी गृहरचना संस्थांनी या मार्गदर्शन सत्राचा लाभ घ्यावा.”
आनंद आंबेकर म्हणाले, “यंदा ऑगस्टमध्ये धरणे भरल्याने आपण खुश झालो; पण परतीच्या पावसाने अचानक पळ काढल्याने आपल्या तोंडचेही पाणी पळाले. यंदा आणखी एका दुष्काळाला सामोरे जावे लागत आहे. अनेक सोसायट्यांमध्ये टँकरने पाणीपुरवठा चालू आहे. बोअरवेल कोरड्या पडल्या आहेत. कारण आपण भूगर्भातून पाण्याचा उपसा करतो; मात्र, भूगर्भात पाणी कोणी भरत नाही. जलसंवर्धन अत्यल्प प्रमाणात होते. बोअरिंग करताना प्रत्येकाने रेन वॉटर हार्वेस्टिंग करून भूगर्भात पाणी सोडले पाहिजे. रेन वॉटर हार्वेस्टिंग सक्तीचे व्हावे. त्यासाठी जनजागृती व्हायला हवी.”
 
लायन्स क्लब ऑफ पुणे मैत्री विषयी : 
लायन्स क्लब ऑफ पुणे मैत्री क्लबचे सदस्य अनेक वर्षे जलसंवर्धनाचे व जलप्रदूषण रोखण्याचे जनजागृतीचे कार्य करीत आहे. आजवर अनेक रेन वॉटर हार्वेस्टिंगचे प्रकल्प राबवून कोट्यावधी लिटर पाणी भूगर्भात मुरवले आहे. मस्तानी तलावातील गाळ काढून त्यातील झरे जिवंत करण्यासाठी या क्लबमधील अनेक सभासदांनी मेहनत करून त्यात यश मिळविले आहे. तसेच गणेशोत्सवात निर्माल्य गोळा करून त्याद्वारे होणारे जलप्रदूषण रोखण्याचा गेली 16 वर्षे प्रयत्न करीत आहेत. 2013 च्या दुष्काळात लायन्स क्लब ऑफ पुणे मैत्रीच्या सदस्यांनी  ग्रामीण भागात दुष्काळग्रस्तांना मदतकार्य पोहोचवले.
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

‘आणीबाणीचे नायक आणि खलनायक’ या पुस्तकाचे विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते प्रकाशन

‘आणीबाणी’ चांगली की वाईट, या वादापेक्षा त्याकडे निरपेक्ष इतिहास...

“एच.डी.मांजरेकर उत्कृष्ट एन.सी.सी कॅडेट ट्रॉफी” वितरण कार्यक्रम संपन्न

मेजर एच.डी. मांजरेकरउत्कृष्ट एन.सी.सी.कॅडेट ट्रॉफी वितरणरक्तदान शिबिराचे आयोजन६१ रक्तदात्यांनी...

देशभक्तीपूर्ण वातावरणात ६४ वा गोवा मुक्ती दिन साजरा; मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडून राष्ट्रध्वजारोहण

‘ऑपरेशन विजय’, पिंटो व कुंकळ्ळी उठावांचा मुख्यमंत्र्यांकडून उल्लेख; पोलीस,...