फिनोलेक्स व मुकुल माधव फाउंडेशनकडून ससून रुग्णालयाला दोन कोटीचे अर्थसहाय्य

Date:

पुणे : पीव्हीसी पाईप्सच्या उत्पादनात भारतातील अग्रणी असलेल्या फिनोलेक्स इंडस्ट्रीज आणि त्यांचे सीएसआर पार्टनर मुकुल माधव फाउंडेशन यांच्याकडून ससून सर्वोपचार रुग्णालयाला दोन कोटी रुपयांच्या अर्थसाहाय्यातून अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणे देण्यात आली आहेत. येत्या १६ एप्रिलला नवजात शिशु अतिदक्षता विभागाच्या (एनआयसीयू) दुसऱ्या, तर एंडोस्कोपी युनिटच्या पहिल्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने या अद्ययावत यंत्रणेचे औपचारिक उद्घाटन होणार आहे.
एंडोस्कोपी युनिट आणि एनआयसीयू या विभागात ही अद्ययावत यंत्रणा बसविण्यात येत आहे. एंडोस्कोपी युनिटमध्ये किरणांपासून बचावासाठी अल्ट्रा साउंड विथ हेड प्रोटेक्शन, थायरॉईड शिल्ड, लीड ऍप्रॉन,प्रोटेक्टिव्ह आय गिअर्स, ओजिडी स्कोप आदी उपकरणांचा, तर एनआयसीयूमध्ये क्रिटिकूल, अत्याधुनिक सेंट्रल एअर प्रेशर, दोन, सिपाप, ब्लड गॅस ऍनालायझर, ब्रेन ऍनालायझर या उपकरणांचा समावेश आहे. एप्रिल २०१७ मध्ये ५९ खाटांचे एनआयसीयू युनिट, तर मार्च २०१८ मध्ये एंडोस्कोपी युनिट सुरु करण्यात आलेले आहे.
जागतिक दर्जाच्या आरोग्य सुविधा सर्वसामान्यांना परवडणाऱ्या दरात उपलब्ध करून देण्याचे ध्येय फिनोलेक्स इंडस्ट्रीज आणि मुकुल माधव फाउंडेशनचे आहे. यासह ससून रुग्णालयात रुग्णांच्या नातेवाईकांसाठी सर्व सोयींनी युक्त असे तीन सुसज्ज विश्रांती कक्ष उभारण्यात आले आहेत. समविचारी लोकांच्या मदतीने फाउंडेशनतर्फे १० लाख रुपयांच्या निधीतून आधुनिक लेसर मशीनद्वारे दंतरोपण सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. अशा प्रकारचे दंतचिकित्सा करणारे हे पहिलेच शासकीय रुग्णालय आहे. डायबेटीस, यकृत प्रत्यारोपण आणि नेत्रोपचार सेवा देण्यासाठी फाउंडेशन प्रयत्नशील आहे. फिनोलेक्स, मुकुल माधव फाउंडेशन २०१२ पासून ससून रुग्णालयांशी जोडले गेले असून, बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयातील गरजू मुलांना अर्थसहाय्य केले जात आहे. १०० विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिकाही उभारण्यात आली आहे.
याविषयी बोलताना मुकुल माधव फाउंडेशनच्या व्यवस्थापकीय विश्वस्त रितू प्रकाश छाब्रिया म्हणाल्या, “केवळ उपक्रमांना अर्थसहाय्य देऊन आम्हाला थांबायचे नाही. पैसे दिले आणि आमची जबाबदारी संपली अशा स्वरूपात आम्ही काम करत नाही. समाजाला चांगल्या आरोग्य सुविधा अल्पदरात उपलब्ध व्हाव्यात, यासाठी प्रयत्नशील आहोत. आमच्याकडे असलेल्या यंत्रणेमार्फत समाजाच्या नेमक्या गरजा ओळखून त्यानुसार त्यावर काम करीत आहोत. एनआयसीयूमुळे गेल्या दोन वर्षात ५२०० बाळांना जीवदान दिल्याचा, तर एंडोस्कोपीमार्फत केवळ ३५० ते ११५० रुपयांत उपचार देण्यात यश आले, याचा आनंद आहे.”
ससून रुग्णालयाचे माजी अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले म्हणाले, “पहिल्यांदाच शासकीय रुग्णालय आणि उद्योगसमूह यांच्या संयुक्त प्रयत्नातून असा एक चांगला उपक्रम सुरु झाला. आज ससून रुग्णालयाला समाजाकडून अर्थसहाय मिळत आहे. त्यामुळे येथील उपचार अत्याधुनिक होत आहेत. सर्वसामान्यांना परवडतील अशा अनेक शस्त्रक्रिया येथे होऊ लागल्या आहेत. ‘ससून फॉर कॉमन मॅन’ ही संकल्पना प्रत्यक्षात येत असून, सामान्यांसाठी ससून रुग्णालय आधार बनत आहे. ससून रुग्णालय अधिकाधिक लोकाभिमुख आणि लोकप्रिय होत आहे.”
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

माणिकराव कोकाटेंची मंत्रिपदावरून हकालपट्टी:मुख्यमंत्र्यांच्या शिफारसीला राज्यपालांची मंजुरी

मुंबई-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माणिकराव कोकाटे यांचे क्रीडा खाते...

घरातच केली हायड्रोपोनिक गांजा ची लागवड -साडेतीन कोटीचा गांजा जप्त

पुणे : ३१ डिसेंबर च्या पार्ट्यांचे आयोजने सुरु असताना...

“आयुष्यावर बोलू काही” आणि बावधन-कोथरूड भूषण पुरस्कार सोहळा गुरुवारी

पुणे: राष्ट्रसेवा प्रतिष्ठानच्या वतीने सलील कुलकर्णी, शुभंकर कुलकर्णी आणि...

‘मनसे’शी युती म्हणजे उबाठा गटाचा अस्तित्व वाचवण्याचा शेवटचा प्रयत्न

भाजपा माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांची प्रखर टीकामुंबई-उबाठा...