सिंधी समाजाचा वधू-वर मेळावा
पुणे : सिंधू सेवा दल आणि भारतीय सिंधू सभा यांच्या संयुक्त विद्यमाने सिंधी समाजातील विवाहेच्छूकांच्या मेळाव्याचे आयोजन केले आहे. रविवार, दि. १७ मार्च २०१९ रोजी सकाळी ९.३० ते दुपारी ४.३० या वेळेत पुणे कॅम्पातील अल्पबचत भवन येथे हा वधू-वर मेळावा होणार आहे, अशी माहिती सिंधू सेवा दलाचे अध्यक्ष दीपक वाधवानी व भारतीय सिंधू सभेचे अध्यक्ष ज्ञान पंजाबी यांनी दिली. सचिन तलरेजा, विजय दासवानी, सुरेश जेठवानी, परमानंद भटिजा, पुरुषोत्तम परयानी, रेश्मा खियानी आदी उपस्थित होते.
एवढ्या मोठ्या प्रमाणात होणार हा सिंधी समाजाचा पाचवा वधू-वर मेळावा असून, त्यासाठी देशभरातून सिंधी समाजातील विवाहेच्छूकांचा या प्रतिसाद मिळतो. समाजातील इच्छूक तरुण-तरुणींना एकमेकांची माहिती सहज उपलब्ध व्हावी, परस्पर परिचय वाढावा व विवाहाच्या निर्णय प्रक्रियेला गती मिळावी, या उद्देशाने हा मेळावा आयोजिला जातो. या मेळाव्यासाठी इच्छूकांनी १० मार्च २०१९ पर्यंत बायोडेटा, फोटो व कुंडली देणे आवश्यक आहे. या मेळाव्याच्या नावनोंदणीसाठी सिंधू सेवा दल (०२०-२६३३३१५९), भारतीय सिंधू सभा (०२०-२६१४०४६६) यांचे संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.