विद्यार्थी गृहात ‘यंत्र अभियांत्रिकी’वर कार्यशाळा
पुणे : “आंतरराष्ट्रीय स्तरावर आपले उत्पादन घेऊन जायचे असेल, तर आपल्याला आंतरशाखीय संशोधनावर भर द्यायला हवा. अभियांत्रिकीच्या विविध शाखांच्या एकत्रीकरणातून नाविन्यपूर्ण उत्पादन निर्मिले पाहिजे. त्यातून रोजगाराच्याही अनेक संधी निर्माण होऊ शकतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी यंत्र अभियांत्रिकीसह इतर शाखांचेही ज्ञान आत्मसात करावे,” असे मत ऍक्युरेट गेजिंग अँड इंस्ट्रुमेंट्सचे व्यवस्थापकीय संचालक विक्रम साळुंखे यांनी व्यक्त केले.
पुणे विद्यार्थी गृहाच्या अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यायाच्या वतीने आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सहकार्याने ‘यंत्र अभियांत्रिकी क्षेत्रातील प्रगती’ या संकल्पनेवर दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन केले होते. यावेळी पुणे विद्यार्थी गृहाचे संचालक व अधिष्ठाता सुनील रेडेकर, प्रा. राजेंद्र कडुसकर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. योगेश नेरकर, उपप्राचार्य डॉ. के. जी. कुलकर्णी, यंत्र अभियांत्रिकी विभागाचे प्रमुख डॉ. शिवाजी गवळी आदी उपस्थित होते.
या कार्यशाळेत मलेशिया येथील डॉ. अब्दुल खालीफ, रशीद आंतरराष्ट्रीय ख्यातीचे तज्ज्ञ डॉ. विजय वऱ्हाडे, डॉ. सबिन मिश्रा, डॉ. नजीब खान, डॉ. प्रदीप हेगडे शारजा मेन्स कॉलेज, दुबई यांनी मार्गदर्शन केले. डॉ. एम. एम. भूमकर व डॉ. जी. एम. मोडक यांनी कार्यशाळेचे समन्वयन केले. डॉ. पी. जी. कुलकर्णी व डॉ. न. गो. जैस्वाल यांनी आभार केले.

