पुणे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कतिक महोत्सव समिती, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यास केंद्र आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सातव्या अखिल भारतीय सम्यक साहित्य संमेलनात यंदाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवनगौरव पु
शनिवार, दि. २३ फेब्रुवारी २०१९ रोजी सायंकाळी ५.३० वाजता संविधाननगरी, बालगंधर्व रंगमंदिरात हा पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे. ज्येष्ठ विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण होणार आहे. यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव, अजिंक्य डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एकनाथ खेडकर उपस्थित राहणार आहेत.
तत्पूर्वी, दुपारी २.३० वाजता संमेलनस्थळी ‘लेखन स्वातंत्र्य आणि सांस्कृतिक दडपशाही’ या विषयावर भारत पाटणकर यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवाद होणार असून, त्यामध्ये राजीव खांडेकर, जयदेव डोळे, संजय आवटे, अरुण खोरे, बालाजी सुतार, अपर्णा लांजेवार, युवराज मोहिते सहभागी होणार आहेत.

