सावरकर जयंतीनिमित्त क्रांतिकारक अभिवादन यात्रा व सेल्युलर जेल राष्ट्रीय स्मारकात ‘वंदे मातरम’चे होणार समूहगान

Date:

पुणे : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या १३५ व्या जयंतीनिम्मित ऑफबिट डेस्टिनेशन, वि. दा. सावरकर प्रतिष्ठान ठाणे, सावरकर दर्शन प्रतिष्ठान मुंबई, ठाणे भारत सहकारी बँक लि. व उचित माध्यम, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने क्रांतिकारक अभिवादन यात्रा व सेल्युलर जेल राष्ट्रीय स्मारकत ‘वंदे मातरम’चे समूहगान आयोजित केले आहे. दिनांक २२ मे ते ४ जून २०१९ या कालावधीत ही यात्रा होणार आहे. यातील बहुतांश प्रवास जहाजमार्गे असणार आहे, अशी ऑफबीट डेस्टिनेशनचे प्रमुख नितीन शास्त्री व ट्रॅव्हल एजंट्स असोसिएशनचे डॉ. विश्वास केळकर यांनी दिली.
नितीन शास्त्री म्हणाले, “स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह जवळपास ९०० क्रांतिकारकांनी आपल्या मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी अंदमानच्या या सेल्युलर जेलमध्ये अनंत यातना सहन केल्या. त्यांनी क्रांतिकारी चळवळीची मशाल तेवत ठेवली. ‘वंदे मातरम’च्या जयघोषाने सेल्युलर जेल परिसर क्रांतिकारकांनी दणाणून सोडला. त्यामुळे अंदमानातील सेल्युलर जेलला आणि वंदे मातरम जयघोषाला ऐतिहासिक महत्व आहे. क्रांतिकारकांच्या या बलिदानाप्रती अभिवादन करण्यासाठी आणि इंग्लंडच्या राणीलाही कापरे भागविणाऱ्या वंदे मातरमच्या जयघोषाने समूहगान करून भारतीयांमधील सुप्त चेतना जागविण्यासाठी या अभिवादन यात्रेचे आयोजन केले आहे.”
“चौदा दिवसांच्या या यात्रेत चेन्नई-अंदमान-चेन्नई हा प्रवास ‘स्वराज द्वीप’ या विशेष जहाजाने करण्याची संधी मिळणार आहे. तीन दिवसांच्या जहाज प्रवासानंतर २८ मे रोजी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या १३५ व्या जयंतीदिनी ढोल-ताशा वादन आणि सेल्युलर जेलमध्ये ‘वंदे मातरम’ समूहगान होणार आहे. त्यानांतर सेल्युलर जेलची पाहणी आणि सावरकर यांच्या कोठडीची दर्शन घेता येणार आहे. तसेच ध्वनी प्रकाश कार्यक्रम पाहता येणार आहे. या यात्रेदरम्यान अंदमानातील बेटे, निसर्ग संपदा, अँथ्रोपोलॉजिकल म्युझियम, सागरिका म्युझियम आदी गोष्टी पाहता येणार आहेत. या अभिवादन यात्रेत आणि समूहगान कार्यक्रमाला भटके व विमुक्त राष्ट्रीय आयोगाचे माजी अध्यक्ष आणि मुंबईतील सावरकर दर्शन प्रतिष्ठानचे अध्यक्ष दादा उर्फ भिकूजी इदाते, केंद्र सरकारच्या राष्ट्रीय शिपिंग बोर्डाचे अध्यक्ष व माजी खासदार प्रदीप रावत यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.”
अधिक माहितीसाठी ऑफबीट डेस्टिनेशन्स, ५८६ शनिवार पेठ, नारायण पेठ पोलीस चौकीजवळ, केळकर रस्ता, पुणे येथे किंवा ९४२२०१०४६७/७३७८८४३६६५ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

केंद्रीय  अर्थसंकल्प लोकाभिमुख, विकासाभिमुख व प्रगतीशीलअर्थसंकल्पातून आत्मनिर्भर भारताचा पाया – प्रकाश जावडेकर

पुणे-‘यंदाचा केंद्रीय अर्थसंकल्प हा लोकाभिमुख असून देशाला वेगाने पंतप्रधान...

राहुल गांधींना लोकसभेत बोलू न देणे मोदी सरकारची हुकूमशाही, चीन सीमेवर काय झाले हे जनतेला समजले पाहिजे: हर्षवर्धन सपकाळ

राज्याला पूर्णवेळ गृहमंत्री नसल्याने कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा, बिश्नोई गँग,...