‘१३ पॉईंट रोस्टर’प्रकरणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियातर्फे तीव्र निदर्शने

Date:

पुणे : नोकर भरतीत १३ पॉईंट रोस्टर पद्धत लागू करण्याविरोधात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियातर्फे (ए) जिल्हाधिकारी कार्यालयावर तीव्र निदर्शने करण्यात आली. तसेच भीमा कोरेगाव प्रकरणी महाराष्ट्र बंद आंदोलनावेळी आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांवर दाखल झालेले गुन्हे मागे घ्यावेत, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. ससून रुग्णालयासमोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार करून घालून आंदोलनाला सुरुवात झाली. आंबेडकर पुतळ्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत शेकडो कार्यकर्त्यांनी घोषणा देत आंदोलन केले.

या आंदोलनात पुण्याचे उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, रिपब्लिकन पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव, पश्चिम युवक आघाडीचे अध्यक्ष परशुराम वाडेकर, शहराध्यक्ष अशोक कांबळे, सरचिटणीस महिपाल वाघमारे, शहर संपर्क प्रमुख अशोक शिरोळे, कार्याध्यक्ष संजय सोनावणे, युवक अध्यक्ष शैलेंद्र चव्हाण, नगरसेविका हिमाली कांबळे, सुनीता वाडेकर, सोनाली लांडगे, महिला आघाडीच्या शशिकला वाघमारे, प्रियदर्शिनी निकाळजे, बसवराज गायकवाड, नीलेश आल्हाट यांच्यासह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते. रिपब्लिकन पक्षाच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन दिले. तहसीलदार हेमंत निकम यांनी हे निवेदन स्वीकारले. तर कार्यकर्त्यांवरील ३५३ कलमांतर्गत दाखल केलेले गुन्हे मागे घेण्याचे निवेदन पोलीस उपयुक्त मितेश घट्टे यांनी स्वीकारले.

डॉ. सिद्धार्थ धेंडे म्हणाले, “पूर्वीच्या २०० पॉईंट रोस्टर पद्धतीमुळे अनुसूचित जाती जमातींना व ओबीसीला ४९ टक्के मिळत होते. मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार १३ पॉईंट रोस्टर पद्धती लागू झाल्यास एससी, एसटी व ओबीसींना लाभ मिळणार नाही. परिणामी समाजात बेकारी वाढेल. त्यामुळे ही १३ पॉईंट रोस्टर पद्धती लागू करू नये. तसेच केंद्र शासनाने अध्यादेश काढून या नोकर भरतीला स्थगिती द्यावी. तसेच सदरची नोकरभरती पूर्वीप्रमाणे २०० पॉईंट रोस्टरनुसार करावी”

बाळासाहेब जानराव म्हणाले, “आंबेडकरी कार्यकर्त्यांवर विनाकारण गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. अनेकांवर ३५३ अंतर्गत गुन्हे नोंदवले आहेत. मुख्यमंत्र्यांनी हे गुन्हे मागे घेणार असल्याची घोषणा केली होती. मात्र, अद्यापही त्याची अंमलबजावणी झालेली नाही.” परशुराम वाडेकर, शशिकला वाघमारे यांनीही कार्यकर्त्यांना संबोधित केले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

मोबाईल ॲपद्वारे गर्भलिंग निदान केल्याचा प्रकार उघड

पुणे, दि. 4 मार्च: गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व निदान तंत्रे...

राज्यसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाचा ज्येष्ठ नेते शरद पवार यांना पाठिंबा: हर्षवर्धन सपकाळ

मुंबई, दि. ४ मार्च २०२६.राज्यसभेच्या सात जागांसाठी निवडणूक होत...

श्री रसिकलाल धारीवाल यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ९वे वार्षिक रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न

पुणे- आर. एम. धारीवाल फाउंडेशन तर्फे समाजसेवेची अखंड परंपरा...

मुळा-मुठा नदी प्रदूषणाविरोधात ‘एमआयटी’च्या विद्यार्थ्यांचा एल्गार

नदीपात्रात अवैध कचरा टाकण्याविरोधात विद्यापीठ प्रवेशद्वारावर आंदोलन; आगी व...