मोदी सरकारकडून राज्यघटनेची पायमल्ली- डॉ. विकास आबनावे

Date:

पुणे : “भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेली भारतीय संविधान सर्वोत्कृष्ट निर्मिती आहे. मात्र, संपूर्ण देश भगवा करण्याच्या प्रयत्नात असलेल्या मोदी सरकारकडून भारतीय संविधानाचे पालन होत नाही. स्वायत्त संस्थांवर मर्जीतील माणसांची नेमणूक करून संविधानाची मोडतोड करण्याचा प्रयत्न होत आहे. जातीयवाद्यांच्या हा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी संविधानाचा अनादर करणाऱ्यांना आपण हटविणे गरजेचे आहे,” असे स्पष्ट पुरोगामी विचारवंत आणि महाराष्ट्र विद्यार्थी सहायक मंडळाचे सचिव डॉ. विकास आबनावे यांनी व्यक्त केले.

अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद, तेजस्विनी संस्था आणि आरके फाऊंडेशन आयोजित संविधान जागरण परिषदेत डॉ. आबनावे ‘विधी विधान से संविधान तक’ या विषयावरील व्याख्यानात बोलत होते. कोरेगाव पार्क येथील भारतरत्न मौलाना अब्दुल कलाम आझाद सभागृहात झालेल्या या परिषदेत ज्येष्ठ साहित्यिक आचार्य रतनलाल सोनग्रा, महाराष्ट्र राज्य झोपडपट्टी सुरक्षा दलाचे अध्यक्ष भगवानराव वैराट, आरके फाऊंडेशनच्या अध्यक्ष आरती सोनग्रा, अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष राजकुमार काळभोर, ऍड. राहील मलिक यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी ‘निखाऱ्यावर भाजलेल्या माझ्या मुलांनो’ या पुस्तकाच्या सातव्या आवृत्तीचे प्रकाशन झाले.

डॉ. विकास आबनावे म्हणाले, “सध्याचे सरकार दलित-मुस्लिमामांच्या भावनांशी खेळत आहे. केवळ घोषणाबाजी आणि लोकांची दिशाभूल करण्याचे काम मोदी व त्यांचे सहकारी करीत आहेत. संविधानाने आपल्याला मतदानाचा अधिकार दिलेला आहे. त्याचा योग्य वापर करीत आगामी काळात चांगली माणसे सत्तेवर बसविणे आपली जबाबदारी आहे. रांगेतल्या शेवटच्या माणसापर्यंत न्याय देण्याची दिशा संविधानाने दिली आहे. जातिमुक्त भारत आणि कल्याणकारी राज्य स्थापण्यासाठी संविधानाचे काटेकोरपणे पालन व्हावे. सद्यस्थितीत वैचारिक दिवाळखोरी आपल्याला पाहायला मिळत आहे.”

आचार्य रतनलाल सोनग्रा म्हणाले, “भारतीय संविधान हे फार मौलिक आहे. वैचारिक, मानसिक गुलामगिरीतून मुक्त करण्याचे काम संविधान करते. मात्र, अलीकडच्या काळात संविधानाला सुरुंग लावण्याचे काम काही समाजकंटक करीत आहेत. त्यांचा कुटील डाव समजून घेत संविधानाचे महत्व अबाधित ठेवण्यासाठी आपण जागरूक राहिले पाहिजे.”

भगवानराव वैराट यांनीही आपले मनोगत मांडले. आरती सोनग्रा यांनी प्रास्ताविक केले. राजकुमार काळभोर यांनी सूत्रसंचालन केले. अलका जोशी यांनी आभार मानले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

शहराचं बदलणार रूप … शहर परिवर्तन कक्षाची बैठक संपन्न.

पुणे- वाढता शहरच्या वाढत्या समस्यांना फक्त तोंड द्यायचे नाही...

कर्नाटक पर्यटनाला चालना देण्यासाठी पर्यटन मंत्रालयाने पुण्यात देशांतर्गत पर्यटन बी 2 बी रोड शोचे आयोजन

पुणे, 5 फेब्रुवारी 2026 केंद्र सरकारच्या पर्यटन मंत्रालयाने, त्यांचे प्रादेशिक...