![ग्राहकांची विश्वासार्हता जपण्याला प्राधान्य- विजयकुमार कादे](https://mymarathi.net/wp-content/uploads/2019/01/IMG_0063.jpg)
ग्राहकांची विश्वासार्हता जपण्याला प्राधान्य- विजयकुमार कादे
पुणे : “शेतकरी कुटुंबातून आल्यामुळे पैशांच्या मोलाची जाणीव आहे. मारुती सुझुकीनेही गेली अनेक वर्ष ग्राहकांना विश्वासार्ह सेवा दिलेली आहे. हीच परंपरा आणि विश्वास कायम ठेवत ग्राहकाभिमुख सेवा देण्यावर सुमनकीर्ती कार्सचे प्राधान्य राहणार आहे,” अशी भावना उद्योजक विजयकुमार कादे यांनी केली.
मुंबई-बंगलोर मार्गावरील बाणेर-म्हाळुंगे येथे सुरु करण्यात आलेल्या सुमनकीर्ती कार्स या मारुती सुझुकी अरेना शोरुमच्या उद्घाटनावेळी विजकुमार कादे बोलत होते. यावेळी मारुती सुझुकी इंडियाचे रिजनल मॅनेजर विनित जैन, झोनल मॅनेजर कौशल किशोरे, अभिजित तांदुळवाडकर, दीपक सभरवाल यांच्यासह विजयकुमार कादे यांचा मित्र परिवार, कुटुंबीय व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विजयकुमार कादे म्हणाले, “आमच्याकडे मारुती सुझुकीची 2012 पासून अधिकृत डीलरशीप आधीपासूनच होती. आता आम्ही या पुण्यातील पहिलीच ‘मारुती सुझुकी अरेना’ ही प्रिमियम शोरुम सुरु केली आहे. जवळपास 7000 चौरसफूट परिसरात ही शोरुम असून, येथे 250 पेक्षा कर्मचारी ग्राहकसेवेत असणार आहेत. मारुती सुझुकीची नवी मॉडेल्स येथे सादर करु शकणार आहोत. आई सुमन कादे, दादासाहेब कादे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पत्नी दीपाली कादे यांच्या सहकार्याने व्यावसायात यशस्वीपणे वाटचाल करत आहे, याचा आनंद आहे. ग्राहकांचा हाच विश्वास यापुढेही जपण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे.”
याप्रसंगी काही ग्राहकांना पाहुण्यांच्या हस्ते गाड्यांची चावी हस्तांतरित करण्यात आली. शोरुमच्या उद्घाटनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.