१४७ गरजू रुग्णांचे कृत्रिम पायरोपण

Date:

लायन्स क्लब्ज इंटरनॅशनलतर्फे दोन दिवसीय शिबीराचे आयोजन
पुणे : द इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ लायन्स क्लब्ज डिस्ट्रिक्ट ३२३४ डी २ यांच्यातर्फे व अहमदाबाद येथील राजस्थान हॉस्पिटलच्या सहकार्याने आयोजित दोन मोफत कृत्रिम पायरोपण (जयपूर फूट) शिबिरात १४७ रुग्णांना कृत्रिम पाय (जयपूर फूट) बसविण्यात आले. याचबरोबर ५३ पोलिओ कॅलिपर्स, २५० पेक्षा जास्त सिंगल स्टिक, नीकॅप, सर्जिकल बूट, कुबड्या व कंबरपट्टा आणि दोन व्हीलचेअर व एक तीनचाकी सायकलचे वाटप या शिबीरात करण्यात आले.
महावीर प्रतिष्ठान, महर्षीनगर पोलीस चौकीजवळ, सॅलिसबरी पार्क येथे या पुणे येथे ५ व ६ जानेवारी रोजी झालेल्या या दोन दिवसांच्या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिराचे उद्घाटन लायन्स क्लबचे प्रांतपाल रमेश शहा यांच्या हस्ते झाले. यावेळी उपप्रांतपाल अभय शास्त्री, जयपूर फूटचे डिस्ट्रिक्ट चेअरपर्सन दीपक शेटिया, राजेंद्र गोयल, वीरेंद्र पटेल, शरद पवार, प्रवीण ओसवाल, तुषार मेहता, सतीश राजहंस, सुनील शेटिया आदी पदाधिकारी उपस्थित होते.
रमेश शहा म्हणाले, “सामाजिक सेवेत लायन्स क्लब नेहमीच पुढाकार घेत असून, हे ५३ वे शिबीर होत आहे, याचा आनंद वाटतो. समाजातील गरजूना, वंचित घटकांना चांगल्या रीतीने आयुष्य जगता यावे, यासाठी लायन्सचे सर्व पदाधिकारी नेहमी प्रयत्नशील असतात. लायन हसमुख मेहता यांनी जयपूर फूट शिबिराची सुरुवात केली. आज हजारो दिव्यांगांना स्वतःच्या पायावर उभे करण्याचे काम लायन्स क्लबने केले आहे.
दीपक सेठिया म्हणाले, “यंदाच्या शिबिराला चांगला प्रतिसाद मिळाला. जवळपास ५०० लोकांनी याचा लाभ घेतला. फाटलेले किंवा विद्रुप असलेल्या ओठ, कान व नाक यावर मोफत शल्य चिकीत्सा शिबीरातही रुग्णांनी सहभाग घेतला. हे शिबीर संपूर्णतः मोफत होते. बाहेरगावच्या रुग्णांच्या राहण्याची व जेवणाची मोफत सोय करण्यात आली होती. आमच्या सर्व स्वयंसेवकांनी अतिशय चांगले नियोजन केले.”
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

केंद्रीय  अर्थसंकल्प लोकाभिमुख, विकासाभिमुख व प्रगतीशीलअर्थसंकल्पातून आत्मनिर्भर भारताचा पाया – प्रकाश जावडेकर

पुणे-‘यंदाचा केंद्रीय अर्थसंकल्प हा लोकाभिमुख असून देशाला वेगाने पंतप्रधान...

राहुल गांधींना लोकसभेत बोलू न देणे मोदी सरकारची हुकूमशाही, चीन सीमेवर काय झाले हे जनतेला समजले पाहिजे: हर्षवर्धन सपकाळ

राज्याला पूर्णवेळ गृहमंत्री नसल्याने कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा, बिश्नोई गँग,...