जिजाऊंनी स्वराज्यासाठी पणाला लावले मातृत्व-डॉ. श्रीपाल सबनीस यांचे प्रतिपादन

Date:

महामाता रमामाई भीमराव आंबेडकर राष्ट्रीय स्मारक समितीतर्फे जिजाऊरत्न पुरस्कारांचे वितरण
पुणे : स्वराज्यासह छत्रपतींना जन्म देणार्‍या माता जिजाऊ येणार्‍या सर्व पिढ्यांना वंदनीय असून प्रेरक व मार्गदर्शक आहेत. त्यांनी आपले सौभाग्य स्वराज्यासाठी पणाला लावले, मातृत्व हिंदवी स्वराज्याला समर्पित केले. स्वराज्यनिष्ठा जोपासण्यासाठी साक्षात मुलास सदैव मृत्यूच्या दारात उभे करणारे खंबिर व ध्येयवादी मातृत्व जिजाऊंनी सिद्ध केले. माता जिजाऊ शिवाजीराजांसह रयतेच्याही माऊली झाल्या, असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले.
महामाता रमामाई भीमराव आंबेडकर राष्ट्रीय स्मारक समितीतर्फे राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त आज (दि. 12 जानेवारी 2021) जिजाऊरत्न पुरस्कारांचे वितरण डॉ. सबनीस यांच्या हस्ते करण्यात आले, त्या वेळी ते बोलत होते. सामाजिक कार्यकर्ते शिवश्री सचिन आडेकर आणि खेड्यापाड्यात वाचनसंस्कृती रुजविण्याचा ध्यास घेतलेल्या प्रियांका चौधरी यांना जिजाऊरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अ‍ॅड. प्रमोद आडकर होते. नगरसेवक अविनाश बागवे, लताताई राजगुरू, भंते हर्षवर्धन, राजेंद्र कुंजिर आदी मान्यवर उपस्थित होते. विठ्ठल गायकावाड यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.
डॉ. सबनीस पुढे म्हणाले, सासर-माहेरच्या संघर्षातूनही जिजाऊंनी मराठी माणसाच्या कल्याणाची वाट शोधली. गाडग्या मडक्यांचा संसार न करता स्वराज्याचा आदर्श कारभार केला. शहाजीराजे, शिवाजीराजे व संभाजीराजे यांच्या भोसलेकुळासह संपूर्ण रयतेला न्याय दिला.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना सचिन आडेकर आणि प्रियांका चौधरी यांच्या कार्याचा गौरव करून अ‍ॅड. आडकर म्हणाले, वाचनातून आयुष्य घडते हे आडेकर यांच्याकडे पाहून दिसून येते. तर चौधरी यांनी वाचनसंस्कृती रुजविण्याचे मोठे काम हाती घेतले आहे.
सत्काराला उत्तर देताना प्रियांका चौधरी म्हणाल्या, राष्ट्रपुरुषांचा इतिहास पुनर्जिवित करून नव्या पिढीला राष्ट्रपुरुषांच्या विचारांची शिदोरी द्यायची आहे. सचिन आडेकर यांनी सामाजिक-राजकीय वाटचालीतील आपला प्रवास उलगडला. अविनाश बागवे यांनी पुरस्कारार्थींच्या कार्याचे कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
विठ्ठल गायकवाड यांनी कार्यक्रमाच्या आयोजनामागील भूमिका विषद केली.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

ओसवाल बिल्डरने जागा बळकावण्याचा प्रयत्न केल्याने ज्येष्ठ नागरिकाची आत्महत्या

पुणे: येथील बाणेर भागात विकसित करण्यासाठी दिलेल्या मिळकतीच्या व्यवहारात...

पुण्यातील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमुळे आज मला मनुवादी वृत्तीच्या विरोधातील पुढचा लढा लढण्यासाठी अधिक बळ मिळाले:हर्षवर्धन सपकाळ

पुणे महानगरपालिकेच्या निवडणुका पार पडल्यानंतर प्रथमच प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धनजी...

अजित पवार विमान अपघाताचा प्राथमिक अहवाल २८ फेब्रुवारीपूर्वीच:केंद्रीय विमान वाहतूकमंत्री मुरलीधर मोहोळ

खासदार जनसंपर्क सेवा अभियानाला मोठा प्रतिसाद पुणे शहराला देशातील सर्वोत्तम...

शासकीय अधिकाऱ्यांनी चांगले वाचन करणे गरजेचे : पुलकुंडवार

दुसऱ्या राज्यस्तरीय शासकीय अधिकारी मराठी साहित्य संमेलनाचा समारोप पुणे (प्रतिनिधी)...