जयहिंदच्या नव्या दालनाचे उद्घाटन अभिनेता अर्जुन कपूर यांची विशेष उपस्थिती
पुणे- सन १९८० मध्ये सुरू झालेल्या जयहिंद दालनाच्या आज अनेक शाखा आहेत. विविध ब्रॅँडचे कपडे विकणारे किरकोळ व्यापारी अशी या दालनाची ओळख निर्माण झाली आहे. पुण्यातील लक्ष्मी रोड, कोथरूड, औंध, कॅम्प, पिंपरी चिंचवड तसेच कोल्हापूर येथे जयहिंदची दालने आहेत. आज पुणे-सातारा रोड येथे (२६ जानेवारी) सातव्या दालनाचे उद्घाटन अध्यक्ष नागराज जैन, व्यवस्थापकीय संचालक दिनेश जैन आणि त्यांचा मुलगा संचालक प्रेषित जैन यांच्या हस्ते झालेे. यावेळी बाॅलीवूड सेलिब्रिटी आणि अभिनेता अर्जुन कपूर यांची विशेष उपस्थिती होती. पारंपारिक पद्धतीने दिवा प्रज्वलित करून उद्घाटन करण्यात आले.
सर्वोत्तम सेवा आणि नवनवीन फॅशनचे कपडे पुरवत असल्याने हे दालन पुरूषांचे खरेदीसाठी आवडते ठिकाण बनले. सर्वोत्तम पारंपारिक पोशाखात आपला ठसा उमटवला आहे. राष्ट्रीय आणि आंतराष्ट्रीय ब्रॅंडस् फाॅर्मल आणि कॅज्युअल कपड्यांचा समावेश आहे. ज्यामध्ये इटलीतून आयात केलेल्या फॅब्रीकचा वापर केला जातो. जयहिंदच्या मेवारतर्फे सिगनेचर एथनिक कपडे ग्राहकांना पुरवले जातात. केवळ पुरूषांच्या पसंतीस उतरत नसून स्त्रियांसाठी लिसा ब्रॅंडचे तर मुलांसाठी चेरी हिल्स् या ब्रॅंडचे कपडे आहेत.
आज (२६ जानेवारी) संपूर्ण दिवस अनेक मजेदार उपक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी सुमारे आठशे प्रेक्षक उपस्थित होते. यामध्ये विविध क्षेत्रातील पाहुणे आणि प्रेक्षकांचा समावेश आहे.