मुंबई-राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना जोरदार टोला लगावला. ”अनेक महिन्यांपासून महाराष्ट्राच्या विधानसभेला या दिवसाची प्रतिक्षा होती. आमच्य़ा सरकारने त्यांना वारंवार विनवणी केली; मात्र त्यांनी आमची विनंती कधीही मान्य केली नाही. राज्यपाल कसा असावा याचा आदर्शच कोश्यारींनी घालून दिला, राज्यपाल महोदयांचे आभार असा उपरोधिक टोला त्यांनी कोश्यारींना लगावला.
महाराष्ट्रात रंगलेल्या सत्तानाट्यानंतर आज विधानसभेत नेत्यांची जुगलबंदी पाहायली मिळाली. राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील यांनी राज्यपालांना त्यांच्या खूमासदार शब्दांमध्ये टोला लगावला.
राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी सुरुवातीलाच राज्यपाल कशाची वाट पाहत होते ते आज लक्षात आले. त्यांनी आधीच सांगितले असते तर एकनाथ शिंदेंनीही आधीच बंड केले असते. त्यामुळे राज्यपालांनी ही मागणी मान्य केली त्याबद्दल त्यांचे आभार असा चिमटा त्यांनी राज्यपालांना काढला. भाजपचे सरकार येताच निवडणूक घेतली, असा पाटील यांच्या बोलण्यातील सूर होता. जयंत पाटील यांनी काढलेल्या चिमट्यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही जशास तसे उत्तर दिले.
आमच्या 12 सदस्यांची नावे मंजूर करा
यावेळी जयंत पाटील यांनी राज्यपालांनी विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घेतली. त्याबद्दल त्यांचे आभार मानले. तर पुढे राज्यपालांना आता विनंती आहे की, त्यांनी शेवटी विधान परिषदेच्या 12 सदस्यांची नावे मंजूर करावी. तसेच ती आम्ही पाठवल्याप्रमाणे मंजूर करावीत. राज्यपाल सर्वांशी समान वागले हा संदेश त्यामुळे जाईल, असा चिमटाही त्यांनी यावेळी काढला.

