‘जय मल्हार’ मध्ये रंगणार समुद्र मंथनाची दिव्य गाथा

Date:

index1 index2

देव देवतांच्या पराक्रमाच्या शौर्याच्या गाथा, आख्यायिका, दंतकथा आपल्याकडे पूर्वापारपासून चालत आलेल्या आहेत. मौखिक परंपरेतून, लोक कलांमधून, पुस्तकांमधून या गोष्टी आपण ऐकलेल्या बघितलेल्या आणि वाचलेल्या असतात. या कथांमध्ये होणारे चमत्कार त्या दैवी गोष्टी आपल्या मनाला कायम भुरळ घालतात आणि त्या कथांचं आकर्षण प्रत्येकच पिढीत असतं. अशाच आख्यायिकांमध्ये प्रसिद्ध असलेली गाथा म्हणजे महादेवाने केलेले समुद्रमंथन. अमृत प्राशन करण्याच्या सुर-असुरांच्या लढ्यात समुद्रातून बाहेर आलेल्या हलाहलाने पृथ्वीचा विनाश होऊ नये म्हणून महादेवाने ते विष प्राशन केल्याची गाथा आपल्या सर्वांनाच माहिती आहे. हीच गाथा एका भव्य दिव्य स्वरूपात प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे झी मराठीवरील जय मल्हार’ या मालिकेमधून. येत्या ५ मे पासून समुद्रमंथनाची ही गाथा या मालिकेत सुरू होणार आहे.

‘जय मल्हार’ मालिकेत सध्या नारद आख्यान सुरू आहे. म्हाळसादेवी आणि बानूला आपल्या मूळ रूपाची जाणीव करून देणे हा या आख्यानाच्या उद्देश. या आख्यानातून ज्या कुणाला मुळ रूपाबद्दल आधी समजेल तिच्यासोबत मल्हार कैलास पर्वतावर जाणार त्यामुळे म्हाळसा आणि बानूमध्ये याबाबत एक वेगळीच धडपड सुरू आहे. नारदमुनी विविध कथा या आख्यानामधून मांडत  आहेत ज्यातून म्हाळसा आणि बानूला अनेक नव्या नव्या गोष्टी कळत तर आहेतच पण सोबतच काही प्रश्नही पडत आहेत. नारदमुनींच्या याच आख्यानात आता समुद्रमंथनाची गाथा बघायला मिळणार आहे.

दुर्वास ऋषींनी दिलेल्या शापामुळे या सृष्टीतून लक्ष्मीमाता समुद्रात लुप्त होतात आणि त्यांना परत मिळवण्यासाठी समुद्रमंथनाचा मार्ग पुढे येतो. यासाठी श्री विष्णू कुर्मावतार घेतात. या मंथनासाठी मेरू पर्वताचा रवी म्हणून तर वासुकीचा दोरी म्हणून वापर करण्यात येतो. या समुद्रमंथनातून बाहेर येणारी रत्ने, ते मिळवण्यासाठी  देव आणि दैत्यात होणारी लढाई यादरम्यान बाहेर येणारं हलाहल या सर्व गोष्टींचा प्रवास अतिशय रंजक पद्धतीने ‘जय मल्हार’ मालिकेत बघायला मिळणार आहे. समुद्रातून बाहेर आलेलं हे हलाहल पृथ्वीचा विनाश करणार हे लक्षात येताच महादेव हे सारं हलाहल प्राशन करतात ते त्यांच्या शरीरात पसरण्यापूर्वी पार्वतीदेवी तिथे येतात आणि आपल्या दिव्य शक्तीने ते हलाहल त्यांच्या कंठाशी रोखून धरतात. या आख्यायिकेवरूनच महादेवाचं ‘नीलकंठ’ हे नाव पडलं. समुद्रमंथनाची ही रोमहर्षक गाथा जय मल्हार’ या मालिकेत येत्या मे पासून सायंकाळी वा. बघायला मिळेल फक्त झी मराठीवरून

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पाइपलाइन गॅस व सीएनजी वितरणासाठी केंद्र सरकारचा नवा आदेश: विना अडथळा खोदकाम करता येणार

पुणे : केंद्र सरकारने देशभरात नैसर्गिक गॅस व पेट्रोलियम...

पुण्यात ४२४ प्रकरणांत गंभीर फेरफार अनियमितता:महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमातील ‘कलम १५५’ चा गैरवापर

दोषींवर निलंबनासह कठोर कारवाईचे महसूल मंत्री बावनकुळे यांचे निर्देश जबाबदार...

हिंदवी स्वराज्य शपथभूमी श्री क्षेत्र रायरेश्वर येथे विशेष सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात संपन्न

शाहिरी-गायन-वादन सादरीकरणातून स्वराज्य संकल्पनेचा जागर पुणे, दि. २६ मार्च :महाराष्ट्र...

शिवसृष्टी प्रकल्पासह शहराच्या मूलभूत प्रश्नांवर ठोस भूमिका – नगरसेवक हर्षवर्धन मानकर

पुणे महानगरपालिकेच्या सन २०२६–२७ च्या अंदाजपत्रकावर झालेल्या चर्चेदरम्यान नगरसेवक...