पुणे: लडाखच्या आव्हानात्मक आणि नयनरम्य केंद्रशासित प्रदेशात जाणाऱ्या राइडिंग सीझनच्या आगमनाच्या वेळी जावा येझदी मोटरसायकलने देशभरातून या प्रदेशात जाण्याची योजना आखत असलेल्या कम्युनिटी सदस्यांसाठी नुकताच एक सेवा उपक्रम सुरू केला आहे. ‘सर्व्हिस इज ऑन अस’ हा उपक्रम देशाच्या प्रमुख भागांतून लडाखच्या प्रदेशात येणाऱ्या प्रमुख मार्गांवर मोटरसायकल स्वारांना मोफत सेवा सहाय्य देईल.
या उपक्रमांतर्गत मार्गालगत असलेल्या प्रमुख शहरांमध्ये असलेली सेवा केंद्रे रायडर्सना आवश्यक सेवा सहाय्य पुरवतील. ठराविक कालावधीसाठीचे कामगार शुल्क आणि चालू दुरुस्तीसाठी कामगार शुल्क पूरक आणि विनामुल्य असेल. रायडर्स लेह सर्व्हिस स्टेशनवर पूरक २६ पॉइंट जनरल चेक-अप देखील करून घेऊ शकतात. कंपनी आवश्यक साधने आणि सुटेभाग यांसह सुसज्ज असलेले तज्ञ तंत्रज्ञ लेह येथे देखील तैनात करेल. आरएसए धोरण मार्गदर्शक तत्त्वांनुसार आरएसए पॉलिसीधारक मार्गातील ब्रेकडाउन सहाय्यासाठी पात्र असतील तर गैर- आरएसए पॉलिसी धारक सशुल्क आधारावर असे करण्यास सक्षम असतील.
जावा आणि येझदी समुदायाच्या रायडर्सना हा सेवा उपक्रम समर्पित करताना क्लासिक लिजेंड्स मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष सिंग जोशी म्हणाले, “एखाद्याच्या स्वप्नातील गंतव्यस्थानापर्यंत जाण्यासाठी खूप नियोजन करावे लागते आणि या ‘सर्व्हिस इज ऑन अस’ उपक्रमाच्या साथीने आमच्या रायडर्सना एका गोष्टीची कमी काळजी करावी लागेल आणि ती म्हणजे संपूर्ण मार्गात मिळणारे सेवा पाठबळ. जावा आणि येझदी रायडर्सच्या मुक्त उत्साहीपणाला आणि शोध घेण्याच्या त्यांच्या ऊर्मीला हा उपक्रम समर्पित आहे. आणि ते या प्रवासात असताना सेवा सहाय्य पुरविण्याच्या बाबतीत त्यांना संपूर्ण मन:शांती मिळवून देणे हे आमचे ध्येय आहे.”
लडाखला जाण्यासाठी दोन सर्वात लोकप्रिय मार्गांनी NCR मध्ये विलीन होणाऱ्या देशाच्या जवळजवळ प्रत्येक कानाकोपऱ्यातून निघालेल्या रायडर्सना सर्वसमावेशक सेवा कवच देण्याचे या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे. एक चंदीगड आणि मनाली मार्गे आणि दुसरा जम्मू, श्रीनगर आणि कारगिल मार्गे. पश्चिम बंगाल, केरळ, कर्नाटक, तामिळनाडू, महाराष्ट्र आणि दिल्ली या राज्यांमधूनप्रवासाला सुरुवात करणारे जावा-येझदी कम्युनिटीचे सदस्य खाली नमूद केलेल्या तपशिलानुसार या सेवेचा लाभ घेऊ शकतात.
दिल्लीहून रायडर्स नोएडा, गाझियाबाद आणि गुडगाव येथील सेवा केंद्रांचा वापर हरियाणा-फरीदाबाद, अंबाला आणि कर्नाल, चंदीगड, हिमाचल प्रदेश-मंडी, पंजाब – होशियारपूर आणि पठाणकोट, जम्मू-काश्मीर-जम्मू आणि श्रीनगर येथे जाण्यासाठी करू शकतात.
कोलकाता, पश्चिम बंगालपासून सुरू होणारा हा मार्ग झारखंड, बिहार, उत्तर प्रदेश, दिल्ली/एनसीआर, हरियाणा, चंदीगड, हिमाचल प्रदेश, पंजाब आणि जम्मू आणि काश्मीर या राज्यांमधून जातो. दिल्लीच्या पुढे वर उल्लेख केलेला मार्ग घेताना या मार्गावर धोरणात्मकरित्या निवडलेली प्रमुख सेवा स्थाने झारखंड धनबाद, बिहार – आराह आणि पटना, उत्तर प्रदेश – लखनौ आणि आग्रा असतील.
बंगळुरू, कर्नाटक येथून येणाऱ्या रायडर्ससाठी पसंतीचा मार्ग तेलंगणा, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, दिल्ली/एनसीआर, हरियाणा, चंदीगड, हिमाचल प्रदेश, पंजाब आणि जम्मू आणि काश्मीर या राज्यांमधून जातो. या मार्गावरील सेवा स्थाने तेलंगणा – हैदराबाद, महाराष्ट्र – नागपूर, मध्य प्रदेश – ग्वाल्हेर आणि भोपाळ, उत्तर प्रदेश – झाशी आणि आग्रा असतील.
मुंबईहून लडाखला जाताना गुजरात, राजस्थान, उत्तर प्रदेश, दिल्ली/NCR, हरियाणा, चंदीगड, हिमाचल प्रदेश, पंजाब आणि जम्मू आणि काश्मीर या राज्यांतून जाणाऱ्या मार्गावर गुजरात- सुरत, भरूच, वडोदरा आणि अहमदाबाद , राजस्थान – उदयपूर, अजमेर आणि जयपूर येथे सेवा स्थाने असतील.
रायडर्स जावा आणि येझदीच्या अधिकृत वेबसाइटवरील डीलर लोकेटर विभागात त्यांच्या मार्गात येणाऱ्या डीलरशिप आणि सेवा केंद्रांची सर्वसमावेशक यादी देखील तपासू शकतात.

