संघाची भूमिका कायम देशाच्या एकात्मतेची व राष्ट्रहिताची जावेद अख्तर यांनी सर्वप्रथम संघाचा इतिहास तपासावा..विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर

Date:

मुंबई – गीतकार आणि लेखक जावेद अख्तर यांनी सर्वप्रथम संघाचा इतिहास तपासावा, संघाचं काम नेहमीच राष्ट्रहितासाठी व एकात्मतेचे असतं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ राजकरणापलीकडे जाऊन देशभक्तीने काम करत आहे. त्यामुळे जावेद अख्तर यांनी कोणत्याही प्रकारे संघाच्या कार्याचा अभ्यास न करता अशाप्रकारचं वक्तव्य केलं असल्याचे सिद्ध होत आहे. त्यांचे वक्तव्य अत्यंत निंदाजनक असून जो संघ राष्ट्रभक्तीने प्रेरित आहे त्यांच्याविषयी असं बोलणं म्हणजे राष्ट्रहिताच्या विचाराच्या विरोधात त्यांची मुक्ताफळे असल्याची टीका विधान परिषद विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी केली आहे.
लेखक जावेद अख्तर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची (RSS) तुलना तालिबान्यांसोबत केली आहे. तालिबानी प्रवृत्ती रानटी असल्याचे म्हणत आरएसएसला समर्थन करणाऱ्या लोकांनी आत्मचिंतन करायला पाहिजे, असे मत जावेद अख्तर यांनी व्यक्त केले असून त्याविषयी बोलताना दरेकर म्हणाले, जावेद अख्तर यांनी सर्वप्रथम संघाचा इतिहास तपासावा. संघाने देशाच्या एकात्मतेसाठी व राष्ट्रहितासाठी भूमिका घेतली. समाजातील उपेक्षित घटकासाठी काम केलं. सामाजिक बांधीलकीतून अनेक घटक संघाचे काम करत असतात. वनवासी कल्याण आश्रम संघ असो किंवा अनेक घटक असो, त्यामुळे संघ राजकीय प्रेरित कधीच नव्हता आणि कधीच नसतो आणि अशा वेळेला संघाची वज्रमूठ या देशांमध्ये आहे. परंतु त्याचा पोटशूळ काही लोकांच्या मनामध्ये आहे, तो अधून मधून अशा व्यक्तव्यातून बाहेर येत असल्याचा टोलाही दरेकर जावेद अख्तर यांना लगावला.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

भरत नाट्य संशोधन मंदिराच्या संगीत पद्माराणी नाटकास ११ पारितोषिके

पुणे : ६४व्या महाराष्ट्र राज्य संगीतसूर्य केशवराव भोसले संगीत...

कलाकार कट्टा उध्वस्त कराल तर … रोहित पवारांनी दिला इशारा

कलाकार कट्ट्याचा त्रास , व त्याबाबत तक्रारी पोलिसांकडेही नाहीत...

कर्नाटक सरकारची 16 वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडियाच्या वापरास बंदी घालण्याची घोषणा

बेंगलोर - कर्नाटक सरकारने शुक्रवारी 16 वर्षांखालील मुलांसाठी सोशल...

सोने 3 दिवसांत 8,000 ने स्वस्त, चांदी 26,000 ने घसरली

आज म्हणजेच 6 मार्च (शुक्रवार) रोजी सोने आणि चांदीच्या...