पुणे: बालपण नेहमी सर्वांसाठी विशेष आहे. मुले हे जगाचे खरे प्रकाशमान आहेत. त्यांच्या चेहऱ्यावरचा निष्पाप हसू हा मानवजातीच्या हृदयावर विजय प्राप्त करतो. प्रतिभावान पिढी तयार करण्यासाठी, या वर्षी सुंदरजींच्या संस्थेने ‘माइंड वेंचर इंटरनॅशनलच्या’ सहकार्याने शंकरशेठ रस्त्यावर “जश्न-ए-बचपन” या कार्यक्रमाचे आयोजन केले.
“जश्न-ए-बचपन” या कार्यक्रमाने मुलांना आणि त्यांच्या पालकांना कायम लक्षात राहतील असे एक अविस्मरणीय आनंदाने भरलेले अनुभव दिले. कार्यक्रमाचा भाग म्हणून, लहान मुलांना आणि त्यांच्या पालकांना वेळेचा सदुपयोग करण्यासाठी असंख्य कार्यक्रमांची आखणी करण्यात आली होती. जश्न-ए-बचपन मध्ये कला, साहसी खेळ, फिटनेस आणि विविध कौशल्याचा समावेश होता.
सदर कार्यक्रम सर्व मुलांसाठी खुला होता आणि कार्याक्रामध्ये मुलांसाठी विशेष करून जवाहरलाल नेहरु कला व चित्रकला क्षेत्र, सैन्यातील साहसी खेळ, विटी – दांडू, ड्रम सर्कल, लाइव्ह म्युझिक आणि जेवण्यासाठी स्टाल ची व्यवस्था करण्यात आली होती.
“जश्न-ए-बचपन” या कार्यक्रमात विशेष अतिथी म्हणून श्रीनाथ भिमाले आणि कविता वैरागी हे उपस्थित होते. तसेच डान्स प्लस 3 शो मधील टीव्ही सेलिब्रिटीज ‘तरुण निहलानी’ आणि ‘शिवानी’ उपस्थित होते.”जश्न-ए-बचपन” च्या मागे मुख्य कल्पना म्हणजे पालक, मुले आणि सर्व वयोगटातील लोकांना गाणे, नृत्य, सायकल, स्केटिंग किंवा वेगळ्या खेळ खेळण्यासाठी रस्त्यावर आणून आणि आनंद साजरा करणे हि होती.