पुण्यातील तबलावादक व संगीतकार उदय देशपांडे यांची आंतरराष्ट्रीय झेप
संगीत माणसाला जगायला शिकवते, संगीत माणसाला थिरकायला लावते. संगीताला कोणत्या सीमा, धर्म, पंत अडवू शकत नाही. कारण संगीत हे प्रत्येक मनावर अधिराज्य करत असते. संगीत सीमा धर्म पंत यांना एकत्र आणते.त्यांच्याशी जवळीक साधते आणि याचा साधक असतो संगीतकारच…
पुण्यातील प्रसिद्ध संगीतकार व तबलावादक उदय देशपांडे त्यांच्या प्रत्येक मैफिलीत रसिकांच्या मनाचा ठावं घेतात. हा कलाकार आता आंतरराष्ट्रीय स्थरावर पुण्याचं नाही भारताचे प्रतिनिधित्व करत आहे. निमित्त आहे कॅनडामधील टोरं टो कॅलगरी एडमिंटन या शहरात आंतराष्ट्रीय संगीत महोत्सव पार पडतोय या महोत्सवात ते शास्त्रीय संगीतावर आधारित काही फ्युजन रचना साजऱ्या करणार आहेत. उदय देशपांडे हे जगप्रसिद्ध तबलावादक उस्ताद अल्लरखा व पं. योगेश समसी यांचे ते शिष्य आहेत. आंतरराष्ट्रीय स्थारावर मिळालेली ही संधी माझ्या गुरूंमुळे मला मिळाली अशी भावना त्यांनी व्यक्त केली