वॉशिंग्टन – .
अमेरिकेतील अध्यक्षीय निवडणुकीचे निकाल हाती आले आहेत. रिपब्लिक पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प आणि डेमोक्रेटिक पक्षाचे ज्यो बायडेन यांच्यामध्ये झालेल्या चुरशीच्या लढतीमध्ये बायडेन यांनी बाजी मारली आहे. बायडेन यांच्याकडे सध्या 284 इलक्टोरल मते असून ट्रम्प अद्याप 250 मतांवरच आहेत. मतमोजणी सुरु झाल्यापासूनच बायडेन आघाडीवर होते. अखेर त्यांच्या विजयावर शिक्कामोर्तब झाला आहे. 2020 ची अमेरिकीतील अध्यक्षीय निवडणूक सर्वार्थाने वेगळी ठरली.
मतमोजणीच्या अखेरच्या टप्प्यात अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. यामध्ये मतमोजणीवर आक्षेप घेत ट्र्म्प न्यायालयात पोहोचले होते. मात्र तिथे त्यांनाही धक्का बसला.
जो बायडन यांच्या विजयाची खात्री होताच त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली होती. अध्यक्षीय निवडणुकीत विद्यमान अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पिछाडीवर पडल्याचे चित्र होते.मात्र, आता या निवडणुकीचा निकाल लागला आहे. जो बायडन यांनी 270 चा मॅजिक फिगर पार केला आहे. दरम्यान, अमेरिकेच्या इतिहासात आतापर्यंत झालेल्या निवडणुकींमध्ये (US Election) यंदाची निवडणूक ही वेगळी ठरली. कोरोनाच्या संकटकाळात झालेला प्रचार, प्रतिस्पर्धी उमेदवारांनी एकमेकांवर केलेले आरोप, सध्याचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी मतमोजणीवरून केलेले आरोप आणि न्यायालयात घेतलेली धाव, मतमोजणीला झालेला विलंब यामुळे निवडणूक चांगलीच गाजली.