पुणे-वानवडीमध्ये जांभुळकर परिवाराची स्थापना नुकतीच करण्यात आली . भैरोबानाला येथील श्री भैरवनाथ मंदिरामध्ये महापूजा करण्यात येऊन जांभुळकर परिवारची स्थापना करण्यात आली . यावेळी वानवडी गावचे सरपंच दत्तोबा जांभुळकर , सुदाम ट्रॅव्हल्सचे संचालक सुदामराव जांभुळकर ,जांभुळकर गार्डनचे संचालक शंभूशेठ जांभुळकर , महेश जांभुळकर , दीपक जांभुळकर , रमेश जांभुळकर आदी मान्यवर उपस्थित होते .
जांभुळकर परिवाराच्यावतीने वानवडीमधील , पुणे शहर , जिल्हा , अन्य शहरातील व परदेशातील जांभुळकरांची नावे एकत्रित करून डिरेक्टरी तयार करण्यात येणार आहे . तसेच जांभुळकर परिवाराचा लवकरच स्नेहमेळावा आयोजित करण्यात येणार आहे .

