पुणे : भक्ती आणि शक्तीचा मिलाप साधणा-या विषयांवरील कीर्तनाद्वारे शालेय विद्यार्थी, तरुणाई, पालक व नागरिकांच्या प्रबोधनाकरीता २ रा कीर्तन महोत्सव न-हे येथील जाधवर ग्रुप आॅफ इन्स्टिटयूटस् तर्फे आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवाला आॅनलाईन पद्धतीने नुकताच प्रारंभ झाला.
राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प.चारुदत्त आफळे यांची कीर्तने या महोत्सवात आहेत. संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, स्वामी विवेकानंद आणि महावीरचक्र विजेते ब्रिगेडियर कुलदीप सिंह चाँदपुरी ( भारत -पाकिस्तान युद्ध १९७१ – लौंगेवाला) याविषयांवर दिनांक ८ जून पर्यंत दररोज सायंकाळी ७ वाजता कीर्तन होणार आहे.
अॅड.शार्दुल जाधवर म्हणाले, शिक्षणमहर्षी प्राचार्य डॉ. सुधाकरराव जाधवर यांच्या वाढदिवसानिमित्त जाधवर ग्रुप आॅफ इन्स्टिटटस्च्या वतीने या दुस-या कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यार्थी व तरुणवर्गाला आपल्या परंपरा, कला व संस्कृतीचे दर्शन व्हावे, याकरीता असे उपक्रम घेतले जातात. https://youtube.com/c/JadhavarGroupAdvShardulraoSudhakarraoJadhavar या लिंकवरुन कीर्तनांचा विनामूल्य आनंद घेता येईल.
प्राचार्य डॉ.सुधाकरराव जाधवर म्हणाले, सर्व समाज ज्ञानवंत झाला पाहिजे, विचारी झाला पाहिजे, यादृष्टीने जाधवर इस्टिटयूटस् वेगवेगळ्या घटकांसाठी उपक्रम राबविते. भागवत धर्माची पताका फडकवित राहिले पाहिजेत, याकरीता भक्ती व शक्तीचा मिलाप असलेला हा कीर्तन महोत्सव राबविण्यात येत आहे. कीर्तनातील विषयांतून सर्वांना आताच्या काळात प्रेरणा मिळेल, त्यामुळे सर्वांनी कीर्तनांचा आनंद घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
भक्ती-शक्ती’ संकल्पनेवरील २ -या कीर्तन महोत्सवाला प्रारंभ
Date:

