डॉ. सुधाकरराव जाधवर सोशल अॅण्ड एज्युकेशन ट्रस्ट व जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट आयोजित कै.आ.रमेश वांजळे निबंध लेखन स्पर्धा व कै. उद्धवराव तुळशीराम जाधवर वक्तृत्व स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले. यावेळी शिक्षणतज्ज्ञ फुलचंद चाटे, अभिनेता स्वप्नील जोशी, अभिनेत्री नीता शेट्टी, संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुधाकर जाधवर, उपाध्यक्ष शार्दुल जाधवर आदी उपस्थित होते.
शार्दुल जाधवर म्हणाले की, स्पर्धेच्या माध्यमातून विविध विषयांच्या माहितीचा अभ्यास विद्यार्थ्यांनी करावा व यातून विद्यार्थ्यांना आपले विचार मांडता यावेत, याकरीता निबंध व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांच्या कलेला वाव मिळावा, याकरीता ट्रस्टच्या माध्यमातून विद्यार्थांकरीता विविध उपक्रम राबविले जातात, असेही त्यांनी सांगितले. डॉ. सुधाकर जाधवर यांनी आभार मानले.