पुणे: राउंड टेबल इंडियाने अलीकडेच पिंपरी सांदेस, नावाच्या खेड्यात पेरने फाट्याजवळ जनता विद्यालयाची स्थापना केली आले, ह्यावेळी बॉलीवूड अभिनेता जॅकी श्रॉफ यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले होते. आता ते राउंड टेबल इंडियाचे ब्रँड अॅम्बेसेडर आहेत.
‘जनता विद्यालया’मध्ये सध्या 650 विद्यार्थी आहेत आणि राउंड टेबल इंडिया या गावातील मुलांसाठी शाळा बांधत आहे. या कार्यक्रमात राऊंड टेबल इंडियाचे वरिष्ठ सदस्य ललित पीट्टी, अविनाश अगरवाल, प्रकाश शाह, विकास गोयल, सचिन खंडेलवाल आणि राहुल वाधवा उपस्थित होते.
ह्या आनंदाच्या प्रसंगी जॅकी श्रॅाफ सर्व विद्यार्थी आणि गावकर्यांबरोबर रमले, ते म्हणाले की मला खूप आनंद झाला आहे की ललित पिट्टी ( अध्यक्ष, पीएसआरटी १७७) ने मला ह्या कार्यक्रमासाठी आमंत्रित केले आहे. माझे असे मत आहे कि प्रत्येक मुलाला शिक्षणाचा अधिकार आहे. या कार्यक्रमाला आसपासच्या खेड्यातील जवळपास 2000 लोक उपस्थित होते.
या कार्यक्रमात एका विशेष वृक्षारोपण मोहीम देखील राबविण्यात आली होती ज्यात जॅकी आणि शाळेतील विद्यार्थ्यांनी रोपे लावली.