पुणे-बालेवाडी – बाणेर येथील बाणेर गावच्या कमानीजवळ स्वराज्य प्रतिष्ठान बाणेर यांच्या प्रयत्नातून अखंड हिंदुस्थानचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाचा भव्य दिव्य चा लोकार्पण सोहळा शिवजयंतीच्या पूर्व संध्येला ता. 18 रोजी पार पडला..नगरसेविका स्वप्नाली प्रल्हाद सायकर यांनी या कार्यक्रमाचे आयोजन,संयोजन केले .
बालेवाडी – बाणेर येथील बाणेर गावच्या कमानीजवळ स्वराज्य प्रतिष्ठान बाणेर यांच्या प्रयत्नातून अखंड हिंदुस्थानचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य दिव्य चा लोकार्पण सोहळा शिवजयंतीच्या पूर्व संध्येला ता. 18 रोजी पार पडला.
यावेळी बोलत असताना नाना पाटेकर यांनी कार्यक्रमास उपस्थित असणाऱ्या सर्वच पक्षाच्या राजकीय नेत्यांना आम्ही जनतेने तुम्हाला निवडून दिले आहे, त्यामुळे तुम्ही जनतेसाठी काम करणे, त्यांच्या हितासाठी झटणे हे तुमचं काम आहे, आणि ते काम जर तुम्ही योग्य रित्या केले नाही तर त्याचा जाब विचारण्याचा हक्क आमचा आहे, आणि आम्ही जाब विचारणार असल्याचे त्यानी सांगितले.
बाणेर येथील स्वराज्य प्रतिष्ठान व नगरसेविका स्वप्नाली सायकर यांच्या विशेष प्रयत्नातून बाणेरगावच्या कमानीजवळ छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारले असून, या स्मारकाच्या खाली एकूण आठ विद्यार्थी एका वेळी बसू शकतील अशी एम. पी. एस सी. च्या मुलांसाठी अभ्यासिका तयार करण्यात आली आहे. या स्मारकासाठी या भागातील सर्व पक्षाच्या नगरसेवक नगरसेविकांनी तसेच अनेक थोर देणगीदारांनी सढळ हाताने मदत केली . या कार्यक्रमाच्या वेळी मान्यवरांचे तसेच सर्व उपस्थित नागरिकांचे स्वागत गणेश कळमकर (उपाद्यक्ष, भाजपा पुणे शहर) यांनी केले, तर प्रस्तावना प्रल्हाद सायकर (अध्यक्ष स्वराज्य प्रतिष्ठान) यांनी केली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले.
स्मारकाचा लोकार्पण सोहळा मोठ्या थाटामाटात ढोलताशाच्या गजरात शिवगर्जना करत भरगच्च अशा लोक उपस्थितीमध्ये बाणेर येथे पार पडला. यावेळी भाजपा अध्यक्ष कोथरूड विधानसभा मतदार संघाचे आमदार चंद्रकांत पाटील, खासदार गिरीश बापट, भाजपा पुणे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक, महापौर मुरलीधर मोहोळ, नगरसेवक बाबुराव चांदेरे, नगरसेविका ज्योती कळमकर, प्रकाश बालवडकर, लहू बालवडकर, मनसे अनिकेत मुरकुटे, योगीराज पतसंस्था संस्थापक अध्यक्ष ज्ञानेश्वर तापकीर, बाणेर नागरी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष दिलीप मुरकुटे तसेच, इतर मान्यवर उपस्थित होते.

