मनमोहन इस्पातचा सणसवाडी येथे नवीन उत्पादन प्रकल्प कार्यान्वित

Date:

पुणे : जेएसडब्ल्यू स्टीलचे वितरक असलेल्या मनमोहन इस्पातने पुण्यात सणसवाडी येथे नवीन उत्पादन प्रकल्प कार्यान्वित केला आहे. या प्रकल्पाचे उद्घाटन जेएसडब्ल्यूच्या विक्री व विपणन विभागाचे सरव्यवस्थापक संजय मित्तल,चॅनल सेल्स विभागाचे सरव्यवस्थापक निलेश मलानी,क्षेत्रीय विक्री व्यवस्थापक जयप्रकाश तिवारी व मनमोहन इस्पातचे व्यवस्थापकीय संचालक भैरूलाल राठोड यांच्या हस्ते संपन्न झाले. या उत्पादन प्रकल्पामुळे पुणे,सोलापूर व नाशिक जिल्ह्यातील ग्राहकांच्या वाढत्या गरजांची पूर्तता करता येईल.
याप्रसंगी बोलताना जेएसडब्ल्यूच्या विक्री व विपणन विभागाचे सरव्यवस्थापक संजय मित्तल म्हणाले,हा उत्पादन प्रकल्प जेएसडब्ल्यू एक्सप्लोर या प्रकारातील असून यामुळे ग्राहकांना मूल्यावर्धित सेवा व उच्च दर्जाची उत्पादने मिळतील.
मनमोहन इस्पातचे व्यवस्थापकीय संचालक भैरूलाल राठोड म्हणाले,या उत्पादन प्रकल्पात कॉइल शीटस्च्या स्वरूपात येणार्‍या धातूला प्रोफाईलिंग व रोलिंग मशीन्सच्या साहाय्याने आकार दिला जातो.या प्रकि‘येनंतर रूफींग शीट तयार होते,जे घरे,हॉटेल्स,इंडस्ट्रीयल शेडस्,कॅन्टीन्स,अ‍ॅग्रीकल्चरल शेडस् इत्यादी ठिकाणी वापरले जाते.
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

शहराचं बदलणार रूप … शहर परिवर्तन कक्षाची बैठक संपन्न.

पुणे- वाढता शहरच्या वाढत्या समस्यांना फक्त तोंड द्यायचे नाही...

कर्नाटक पर्यटनाला चालना देण्यासाठी पर्यटन मंत्रालयाने पुण्यात देशांतर्गत पर्यटन बी 2 बी रोड शोचे आयोजन

पुणे, 5 फेब्रुवारी 2026 केंद्र सरकारच्या पर्यटन मंत्रालयाने, त्यांचे प्रादेशिक...