पुणे- शहराला मेट्रो जरूर हवी ,पण पर्यावरणाचा ऱ्हास करून अगर पर्यावरणावर हाथोडे मारून ती आणू नये अशी भूमिका सर्वमान्य असताना नदीपात्रातून जाणारी मेट्रो , त्यासाठी टाकले जाणारे भराव हे नदीवर झालेले अतिक्रमण का मानण्यात येत नाही ? असा सवाल करीत प्रथम हे काम थांबवा आणि यावर मुद्देसूद उत्तरे द्या अशी मागणी मनसेचे शहर अध्यक्ष अजय शिंदे यांनी केली आहे. महापालिका आयुक्त व मुख्य अभियंता जलसंपदा आणि महाराष्ट्र प्रदूषण महामंडळाच्या कडे या संदर्भात मनसेच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे .यावेळी मनसेचे शहर अध्यक्ष अजय शिंदे उपशहर अध्यक्ष राम बोरकर, प्रल्हाद गवळी, हेमंत बत्ते विभाग अध्यक्ष प्रशांत मते , सुनील कदम,सुहास निम्हण, विभाग सचिव वसंत खुंटवड ,राजेंद्र वेडे पाटील, भुपेंद्र शेंडगे, रमेश जाधव ,अभिजित थिटे आदी उपस्थित होते.
या निवेदनात असे म्हटले आहे कि, महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन कडून पुणे शहरात मेट्रो रेल साठी मार्गिका तयार करण्याचे काम चालू आहे त्या पॆकी पुणे शहरातून वाहणाऱ्या मुळा नदीच्या पात्रामधून देखील मेट्रो जाणार आहे साधारण पणे डेक्कन जिमखाना ते पुणे महानगर पालिका अशा मार्गा साठी नदी पात्रात पूल उभारणी करून त्यावरून मेट्रो नेली जाणार आहे .सदर मार्गाला परवानगी देते वेळी देखील या भागातील नदीच्या पर्यावरणाला कोठेही अडथळा होणार नाही कोठेही भराव टाकले जाणार नाही, अश्या स्वरूपाचे प्रस्तुतीकरण मेट्रो कडून केल्या गेलं होत. मात्र गेल्या काही महिन्यात मेट्रो कडून डेक्कन ते पुणे महानगर पालिका या भागातील नदीपात्रात प्रचंड राडारोडा टाकून मोठं मोठे भराव तयार केले जात आहे या भरावाच्या माध्यमातून डेक्कन ते मनपा इमारत या दरम्यानचा नदीपात्रातील नदीचा प्रवाह भविष्यात वळवला जाणार आहे इतकेच नाही तर पावसाळ्यात नदीचे पाणी वाढल्यास किंवा नदीपात्रात धरणातून पाणी सोडल्यास नदी काठालगतच्या पेठामध्ये मोठ्या प्रमाणात पूर येण्याची शक्यता आहे . सदर बाब अतंत्य गंभीर असून नदीच्या पर्यावरणावर हा हल्ला तर आहेच , पण या मुळे मोठ्या प्रमाणावर पूर येण्याची शक्यता आहे .
सबब सदर प्रकरणात संबंधित प्रकार थांबवण्या बाबत त्वरित सूचना ( स्टॉप वर्क नोटीस ) संबंधित कंपनीस देण्यात यावी अशी मागणी मनसेने मनपा आयुक्त व मुख्य अभियंता जलसंपदा आणि महाराष्ट्र प्रदूषण महामंडळाच्या कडे केली आहे

