पुणे,- इशा अग्रवाल, एक स्वतंत्ररित्या काम करणारी मॉडेल आणि अभिनेत्री आहे, सध्या ती स्वताचा शाईन अॉन हा उपक्रम चालवते, शाईन अॉन मध्ये मॉडेलिंग, इमेज मॉनेजमेंट, न्युट्रिशन, आणि फिटनेस वर लक्ष दिले जाते,
नुकत्याच थायलंड, पट्टाया मध्ये झालेल्या सौंदर्य स्पर्धेत इशाने माइलस्टोन मिस इंडिया इंटरनॅशनल प्रिन्सेस 2017 हे शिर्षक जिंकले, ही स्पर्धा ग्लॉमर आणि आकर्षण अशी होती. ह्या स्पर्धेसाठी थायलंडचे रॉयल आणि सन्माननीय मान्यवर मोठ्या संखेने उपस्थित होते.
ग्लॅमर आणि फॉशन विश्वातिल विविध तज्ञ ह्यावेळी परीक्षक म्हणुन उपस्थित होते. अंतिम फेरीचे परीक्षक म्हणून मिसेस वर्ल्ड आणि अभिनेत्री अदिति गोवित्रिकर, मिसेस युनीवर्स साऊथ ईस्ट एशिया मुक्ता चोपडा, मिसेस युनिवर्स
नेपाल पद्मीनी झा, मिसेस इंटनॅशनल कंठीचा चिमसीरी उपस्थित होते.
थायलंडची राजकुमारी,हाँगकाँगची राजकुमारी आणि फिलीपिन्स च्या राजकुमारी ह्यांच्या उपस्थितीत तीला हा सन्मान मिळाला. याचबरोबर तीला मिस टॉलेंटेड प्रिंसेसचे उपशीर्षक देखिल मिळाले, आपल्या ह्या प्रवासाबद्दल मनोगत व्यक्त
करताना इशा म्हणाली, माईलस्टोन मिस इंडिया इंटरनॅशनल प्रिन्सेस 2017 जींकने माझ्यासाठी खुप अभिमानाची गोष्ट आहे. हा अनुभव माझ्यासाठी खुप खास होता. माझ्या आई-वडिलांच्या पाठिंब्या शीवाय मी इथपर्यंत पोहचने शक्य नव्हते. माझ्या बहिणीने मला सक्षम बनविले मला ट्रेन करताना ती एका प्रकारे माझी आईच बनली होती, माझ्या ह्या यशासाठी मित्र-मैत्रिनींच्या आणि हितचिंतकांच्या शुभेच्छा देखील होत्याच.
पूर्वी देखिल तीने मिस इंडिया एक्सक्विसिट 2015, याचबरोबर मिस फोटोजनीक क्विन 2015 चे शिर्षक देखिल जिंकले होते. ब्लाटीमोर, युएसए मध्ये झालेल्या मिस इंटरनॉशनल एक्सक्विसिट 2015 ची ती पहीली रनर-अप होती, ह्याचबरोबर ती मिस फोटोजनीक इंटरनॉशनल क्विन 2015 ठरली..
हे सर्व यश आणि तीच्या ह्या कामगिरी नंतर इशाने न थांबता काम करण्याचा निर्धार केला आहे. फॉशन आणि मॉ़डेलिंग च्या जगात मुलींची एक खास अोळख व्हावी त्यांना चांगल्या संधी उपलब्ध व्हाव्यात ह्या उद्येश्याने ती आपल्या शाईन
अॉन द्वारे कार्यरत राहील.