पुणे-सत्ताधारी पक्ष माजले तर त्यांच्यावर अंकुश ठेवण्याचे काम विरोधी पक्षांचे असते. अधिवेशन अजून ९ दिवस चालणार आहे जपून राहावे . दुसरा बॉम्ब सोमवारी- मंगळवारी देवेंद्र फडणवीस हेच टाकतील त्याचवेळी ते आम्हालाही समजेल .पुण्यातील नदी सुधार प्रकल्पा बाबतीत मुंबई त झालेली बैठक बेकायदा असल्याचे सांगून ते म्हणाले, अजित पवारांना बाजूला ठेऊन नवीन सुपर पॉवर तयार करण्याचे काम त्यांच्या पक्षात होते आहे .भाजपा प्रदेश अध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील वानवडी मध्ये नगरसेविका कालिंदा ताई पुंडे यांनी आयोजित केलेल्या महात्मा फुले यांच्या पुतळ्याचे व सावित्रीमाई फुले डायलेसीस सेन्टरच्या लोकार्पनासाठी आले असता माध्यमांशी बोलताना ……म्हणाले,
‘देशातील लोकशाही संपलेली नाही. महाराष्ट्रातल्या १२ कोटी जनतेने दोन दिवस सुरु असलेला तमाशा पाहिलेला आहे. ज्या माणसाने अधिकाऱ्यांच्या बदल्यांमधील घोटाळ्याची माहिती गोळा केली आणि केंद्रीय गृहसचिवांना दिली त्यांनाच तुम्हाला माहिती कुठून मिळाली असे विचारले जात आहे. तुम्हाला याची माहिती मिळालेली नाही ते आधी बघा. विरोधी पक्षांना याचे स्वातंत्र्या आणि अधिकार असतो. लोकशाहीमध्ये सत्ताधारी पक्ष माजतो, नियंत्रणाच्या बाहेर जातो. अशावेळी विरोधी पक्षाने त्याच्यावर अंकुश ठेवायचा असतो. तो ठेवताना गोळा केलेली माहिती कुठून मिळाली हे सांगणे आवश्यक नसते. या गोंधळामध्ये देवेंद्र फडणवीसांना घेण्याचा प्रयत्न सुरु आहे. पण देवेंद्र फडणवीस पोहोचलेले खेळाडू आहेत,” असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले.“तुम्ही प्रसाद लाड, प्रवीण दरेकर यांना अडकवण्याचा प्रयत्न केला. पण कोर्टाने त्यांना दिलासा दिला. देवेंद्र फडणवीस कोर्टाच्या विरोधात गेले नाहीत. गेल्या आठवड्यात त्यांनी जो पेन ड्राईव्ह बॉम्ब टाकला ते हिमालयाचे टोक आहे. सरकारला अजून नऊ दिवस अधिवेशन चालवायचे आहे. जरा जपून रहा,” असा इशारा चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे.पगडीवरून वाद करणारे मूर्ख – चंद्रकांत पाटीलपुण्यात झालेल्या कार्यक्रमात चंद्रकांत पाटील यांना फुले पगडी घालण्यात आली होती. दरम्यान यापूर्वी पुण्यात पगडी घालण्यावरुन वाद झाले. याबाबत चंद्रकांत पाटील यांना विचारले असता पगडीवरून वाद करणारे मूर्ख असतात अशी प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील यांनी दिली. फुले पगडी मला प्रिय आहे. मला फार छान वाटतंय म्हणून मी पगडी काढली नाही. पगडीवरून वाद करणारे मूर्ख असतात. महान नेत्यांच्या कर्तुत्वाला सोडून पगडीवरून भांडत नसतात, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

