भाजपच्या वर्षा तापकीर यांच्या निवडीमागे दडलंय काय ?

Date:

पुणे- मराठा आरक्षणाचा विषय कोर्टात आणि रस्त्यांवर गाजत असताना ,भाजपाने आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मराठी नेत्यांसह मराठी महिला नेत्यांचीही साखळी तयार केली असून आता त्यात पुण्याच्या वर्षा तापकीर यांची भर पडली आहे. बीड च्या प्रीतम मुंडे नाशिकच्या भारती पवार आणि त्यानंतर मुंबईच्या चित्रा वाघ यांच्या नंतर  आता पुण्याच्या वर्षा तापकीर अशी साखळी आगामी महापालिका निवडणुकीत भाजपवरील उच्चवर्णीयांचा पक्ष हा ठपका पुसून तमाम मराठी वर्गाला खेचून घेण्यात यशस्वी कामगिरी करेल असा विश्वास भाजपच्या नेतृत्वाला वाटत असावा असे राजकीय समीक्षकांचे म्हणणे आहे.

राष्ट्रवादीच्या बालेकिल्यात सातत्याने आपला विजय प्रस्थापित ठेवलेल्या नगरसेविका वर्षा  तापकीर यांच्यावर भाजपा प्रदेश उपाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविल्याने  अनेकांना धक्का बसला ,खरे तर त्या महापौर , स्थायी अध्यक्ष अशा पदांच्या शर्यतीत कायम होत्या पण ती पदे त्यांना मिळाली नाही आणि आता थेट भाजपा प्रदेश उपाध्यक्ष पदाची माळ गळ्यात पडल्याने भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची पावले अनेकांना समजेनासी झाली आहे.   उपाध्यक्ष पदाची  माळ यापूर्वी माजी खासदार संजय काकडे यांच्या गळ्यात घातलेली आहेच . अर्थात या निवडी म्हणजे भाजपने आगामी महापालिका निवडणुकीची केलेली सुरुवातच मानली जाते आहे. काकडे आणि तापकीर हे दोघेही मराठा समाजाचे आहेत . काकडे यांनी शहरातील मराठा,बहुजन समाज आपल्याकडे आकर्षित करून ठेवलेला आहे तर आता दक्षिण पुण्यासह तमाम पुणे शहरातील मराठा महिलांचीही मते आकर्षित करण्यासाठी आपले कसब तापकीरांना दाखवावे लागणार आहे. केवळ त्या आता त्यांच्या वार्डापुरत्या मर्यादित राहू शकणार नाहीत तर त्यांच्याकडे प्रामुख्याने  दक्षिण पुणे आणि शहरातील महापालिका निवडणुकीत निवडून येणाऱ्या चेहऱ्यांना ओळखून त्यांना उमेदवारी मिळवून देण्याची जबाबदारी देखील असेल असे दिसते आहे .भाजपच्या त्या १४ व्या उपाध्यक्ष असून अनेक मराठी, बहुजन कार्यकर्त्यांना उमेदवारी देण्यासाठी त्यांची भूमिका महत्वपूर्ण ठरू शकते . प्रदेश उपाध्यक्ष पदावरून च भाजपच्या कोअर कमिटीत समावेश झालेला आहे. त्यामुळे गेली १५ वर्षे नगरसेविका राहिलेल्या तापकीर यांना आगामी महापालिका निवडणुकीत महत्वाची संधी चालून आल्याचे मानले जाते आहे . दक्षिण पुण्यातील कोण कोण भाजपच्या कमळ चिन्हावर निवडून येऊ शकते याबाबत तर त्यांची भूमिका अत्यंत महत्वाची ठरू शकणार आहे. एकूण शहरातील महिला आणि मराठा ,बहुजन उमेदवारीबाबत हि त्यांचा रोल महत्वाचा मानला जाऊ शकणार आहे. भाजपच्या  आमदारांच्या चढाओढीत तापकीर आणि काकडे या दोहोंचीदेखील भूमिका पक्षाला डावलून चालणार नाही हेच या निवडीमागचे द्योतक मानले जाते आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

आजपासून ट्रम्प यांच्या इमर्जन्सी टॅरिफची वसुली बंद:₹16 लाख कोटी परत करावे लागू शकतात; कोर्टाने 3 दिवसांपूर्वी बंदी घातली

अमेरिकन सरकार आजपासून राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी लादलेल्या आपत्कालीन शुल्काची...

कॉम्रेड अंजलीताई महाबळेश्वरकर यांचे निधन:’लाल सलाम’च्या घोषणेत अखेरचा निरोप; मरणोत्तर नेत्रदानाचा आदर्श

सातारा -सातारा नगरपालिकेच्या माजी नगरसेविका व मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या...

शिक्षणाचा वारसा जपत माजी विद्यार्थ्यांची आजी विद्यार्थ्यांना शैक्षणिक भेट

कर्मवीर भाऊसाहेब हिरे हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांचा आनंद मेळा उत्साहात पुणे...