कोरोनाच्या २ वर्षानंतर आता मेट्रोचे होणार आक्रमण
पुणे-कोरोना च्या काळात अडचणीत आलेले बालगंधर्व रंग मंदिर आता मेट्रोच्या तावडीत सापडण्याची चिन्हे आहेत .या रंग मंदिराची पार्किंगची १५०० चौ. फुट जागा मेट्रोला हस्तांतरित करण्याचा प्रस्ताव शहर सुधारणा समिती कडे महापालिका आयुक्तांनी पाठविला आहे.
संभाजी उद्यान मेट्रो स्टेशन येथील सर्विसेस आणि भूमिगत टाकी करता मंजूर असलेले 5166 चुरस फुटाचे क्षेत्र वापरता येत नसल्याने त्या ऐवजी बालगंधर्व रंगमंदिराच्या आवारातील १५०० चौरस फुटाचे क्षेत्र महा मेट्रो ला हस्तांतरित करावे असे महापालिका आयुक्तांनी या प्रस्तावात म्हटले आहे. पुढच्या शुक्रवारी शहर सुधारणा समितीची बैठक ऑनलाईन पद्धतीने होणार आहे त्यात हा विषय मंजूर करवून घेतला जाणार आहे .
बालगंधर्व रंगमंदिराची वास्तू हि सांस्कृतिक दृष्ट्या ऐतिहासिक आणि रसिक व कलाकारांच्या भावनांशी अत्यंत निगडीत असल्याने हि वास्तू आधुनिक काळाकडे वळताना नामशेष होऊ नये ,किंवा तिला धक्का लावत ,लावत ती नाहीसी करू नये या साठी असंख्य वेळा पुण्यातून आवाज उठला पण आता कोरोनाच्या काळानंतर हा आवाज साहजिक क्षीण होऊ पाहत असताना मेट्रोने आपले जाळे टाकायला सुरुवात तर केली नाही ना ? असा प्रश्न या प्रस्तावामुळे उपस्थित होऊ शकणार आहे.
जंगली महाराज रस्ता, तेथील व्यापारी सुटले… पण .. मुठा नदी ,संभाजी बाग, बालगंधर्व सापडले
असंख्य मान्यवर आणि नागरिकांनी वारंवार नदी पात्रात नेलेल्या मेट्रो वर प्रश्न चिन्ह उपस्थित केले आहे .हि मेट्रो जे एम रस्त्याने जाणार होती पण मेट्रोची मार्गिका काही लोकाच्या हितासाठी बदलली गेली . जिला मान्यताच अद्याप मिळालेली नाही असा दावाही वारंवार केला गेला . यामुळे जे एम रोड ,तेथील व्यापारी सुटले पण मुठा नदी,,संभाजी उद्यान आणि बालगंधर्व मात्र मेट्रोच्या तावडीत सापडले असेही म्हटले जाते.

