पुणे- महिलेच्या आरडाओरडा चा आवाज येतोय या एका कॉल वरून बीट मार्शल धावले आणि त्यांनी शोध घेऊन ‘त्या ‘ घराचा दरवाजा तोडून आत चाललेला प्रकार पाहून चार हैवांनाना ताब्यात घेऊन त्यांच्या मुसक्या बांधल्या . ही घटना अन्य कुठल्या राज्यातील ,जंगलातील नाही तर पुण्यातील , पुण्याच्या जनता वसाहतीतील आहे .काल सायंकाळी हा संतापजनक प्रकार घडला .
याप्रकरणी पोलिसांनी अधिकृत रित्या माध्यमांना दिलेल्या माहिती नुसार, पोलीस कंट्रोल रूम मधून दत्तवाडी पोलिसांना वायरलेस मेसेज आला कि एका घरातून महिलेच्या आरडाओरडा ऐकायला येतो आहे. या कॉल नुसार बीट मार्शल आणि चौकीच्या,ठाण्याच्या पोलिसांनी जनता वसाहतीत धाव घेतली आणि जनता वसाहत गल्ली नंबर ८ मध्ये प्रवेश केला .तिथे एका घराजवळ गर्दी दिसली आणि महिलेच्या किंकाळ्या ऐकू आल्या .त्यामुळे त्या घराचे दरवाजे तोडून पोलिसांनी आत प्रवेश केला .आणि त्या महिलेवर सामुहिक बलात्कार करून पळून जाऊ पाहणाऱ्या चौघा हैवानांच्या मुसक्या बांधल्या .
श्रीकांत सुरेश सरोदे (वय ३६ ),आदित्य उर्फ मन्या सुरेश पवार (वय १९ ), दुर्वेश उर्फ पप्पू संतोष जाधव (वय ३६ ),आणि आशिष उर्फ विजय (रड्या )राकेश मोहिते (वय १८) सर्व राहणार गल्ली नंबर ८ जयभवानी नगर , जनता वसाहत ,पर्वती,पुणे अशी या नराधमांची नावे आहेत .यापैकी श्रीकांत सुरेश सरोदे याच्यावर पूर्वीचा खुनाचा व जबरी चोरीचा गुन्हा दाखल आहे, अप्पर पोलीस आयुक्त राजेंद्र डहाळे , उपायुक्त पोर्णिमा गायकवाड सहायक आयुक्त गजानन टोणपे,पीआय विजय खोमणे ,कृष्ण इंदलकर यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार स्वप्नील लोहार , हवालदार कुंदन शिंदे ,राजू जाधव , गणेश कळसकर , अमोल झणझणे,जनजी श्रीमंगले, शिवाजी श्रीसागर ,शरद राउत , अमित सुर्वे,अक्षय वाबळे, नवनाथ भोसले,दयानंद तेलंगे, भारत आस्मार , प्रमोद भोसले, विष्णू सुतार यांनी हि कारवाई केली .