आयफोन तस्करी करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश

Date:

नवी दिल्ली, 28 नोव्हेंबर 2021

महसूल गुप्तचर संचालनालयाने देशात तस्करी होत असलेल्या आयफोनचा साठा पकडला आहे.

अचूक गुप्तचर माहितीच्या आधारावर, महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (DRI) अधिकाऱ्यांनी 26.11.2021 रोजी दोन मालाची तपासणी केली. हा माल हॉंगकाँगहून मुंबईतील छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या एअर कार्गो कॉम्प्लेक्स (ACC), आला होता. आयात मालाच्या दस्तऐवजांमध्ये हा माल “मेमरी कार्ड” म्हणून जाहीर करण्यात आला होता. तथापि, प्रत्यक्ष तपासणीत असे दिसून आले की मालामध्ये खालील वस्तू होत्या-

DescriptionQuantity
iPhone 13 Pro2,245
iPhone 13 Pro Max1,401
Google Pixel 6 pro12
Apple Smart Watch1

अशा प्रकारे, रोखलेल्या मालामध्ये एकूण 3,646 (तीन हजार सहाशे सेहेचाळीस) आयफोन-13 मोबाईल फोन सापडले. कागदपत्रात नमूद न केलेले वर उल्लेख केलेले मोबाईल फोन आणि ऍपल स्मार्ट घड्याळ,या वस्तू सीमा शुल्क कायदा, 1962 अंतर्गत जप्त करण्यात आल्या. जप्त केलेल्या मालाची एकूण किंमत सुमारे रु. 42.86 कोटी रुपये होती तथापि मालाचे घोषित मूल्य फक्त 80 लाख रुपये होते.

आयफोन 13 मॉडेल सप्टेंबर 2021 पासून भारतात विक्रीसाठी आले, ज्याची मूळ किंमत रु. 70,000/- रुपये होती आणि काही उच्च श्रेणीतील मॉडेल्सची किंमत 1,80,000 रुपये होती. भारतात मोबाईल फोन्सच्या आयातीवर 44% प्रभावी सीमाशुल्क लागू होते.

तस्कर आयफोन 13 सारख्या नवीनतम उत्पादनांसाठी त्यांचे तस्करीचे नेटवर्क किती लवकर प्रस्थापित करतात हे या अत्याधुनिक मॉडेल्सच्या फोनच्या इतक्या मोठ्या प्रमाणावरील तस्करीच्या प्रयत्नातून आढळून येते. या शोधामुळे एक गंभीर आयात फसवणूक उघडकीस आली आहे, ज्यामुळे लक्षणीय महसूल परिणाम दर्शवणाऱ्या तस्करीच्या अनन्य आणि अत्याधुनिक पद्धती शोधून त्यांचा मुकाबला करण्यात महसूल गुप्तचर संचालनालयाची क्षमता अधिक मजबूत झाली आहे. देशाच्या आर्थिक सीमांचे रक्षक म्हणून, महसूल गुप्तचर संचालनालय तस्करीचा मुकाबला करण्यासाठी सज्ज आहे

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

बौद्ध धम्म हा मनःशांती ते विश्वशांती चा प्रतीक ~ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

बुद्धगया : भगवान गौतम बुद्धांनी आखिल मानवजातीच्या कल्याणासाठी...

नेपाळमध्ये बस महामार्गावरून नदीत कोसळली, 18 ठार:25 जखमी

काठमांडू:नेपाळमधील धादिंग जिल्ह्यात सोमवारी रात्री उशिरा एक बस महामार्गावरून...

हवामान विभागाचा 7 जिल्ह्यांना ‘येलो अलर्ट’,विदर्भात पावसाचा धुमाकूळ, तर कोकणात आंबा धोक्यात

मुंबई:रविवारी मध्यरात्रीपासून विदर्भातील नागपूर, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांत विजांच्या...

पाकिस्तानस्थित जैश-ए-मोहम्मदचे तीन सदस्य काश्मीर मध्ये ठार मारले..

दहशतवादी एका टेकडीच्या पायथ्याशी असलेल्या मातीच्या घरात लपलेले आढळले...