५० वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या लोकांच्या सुरक्षिततेसाठी ‘स्टार हेल्थ प्रीमियर इन्शुरन्स पॉलिसी’ सादर

Date:

·         ही योजना विशेषत: आजारपणामुळे किंवा अपघातामुळे रुग्णालयात भरती होऊन केलेल्या उपचारांच्या खर्चाची पूर्तता करण्यासाठी डिझाइन केलेली आहे

·         रुग्णालयातील सेवा शुश्रुषा, घरातील उपचार, आयुष उपचार, आधुनिक उपचार इ. विशेष फायदे समाविष्ट.

·         ५० वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या प्रौढांसाठी वैयक्तिक आणि कौटुंबिक फ्लोटर सादर

पुणे २२ मार्च २०२२: भारतातील पहिली स्वतंत्र आरोग्य विमा कंपनी असलेल्या स्टार हेल्थ अँड अलाईड इन्शुरन्स कंपनीने स्टार हेल्थ प्रीमियर इन्शुरन्स पॉलिसी सादर करत असल्याची घोषणा केली आहे. ५० वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या लोकांसाठीची ही योजना असून विशेषत: आजारपणामुळे किंवा अपघातामुळे रुग्णालयात भरती होऊन केलेल्या उपचारांच्या खर्चाची पूर्तता करण्यासाठी डिझाइन केलेली आहे.

स्टार हेल्थ प्रीमियर विमा पॉलिसी विशिष्ट परिस्थितींसाठी होम केअर ट्रीटमेंट (जास्तीत जास्त रु. ५ लाखांच्या विमा रकमेच्या १०% पर्यंत) रूग्णालयात भरती केल्यावर रूग्णालयातील खर्च आणि आयुष उपचारांतर्गत डे केअर उपचार यासारखे फायदे देते. रूग्णालयात दाखल केल्यावर बहुतकरून विमा सुरक्षेतून वगळलेल्या गैर-वैद्यकीय वस्तू जसे की हातमोजे, अन्न शुल्क आणि इतर उपभोग्य वस्तू आणि आधुनिक उपचारांसाठी विम्याच्या रकमेच्या ५०% पर्यंतचे संरक्षण एकतर रूग्ण म्हणून किंवा हॉस्पिटलमधील डे केअर उपचारांचा भाग म्हणून या योजनेतून मिळते. या वैशिष्ट्यांमुळे हे उत्पादन वृद्ध लोकांसाठी योग्य आहे.

ही योजना ५० वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या प्रौढांसाठी वैयक्तिक आणि फ्लोटर अशा दोन्ही प्रकारे उपलब्ध आहे. विमाधारकाला आधीपासून असलेला आजार आहे, तो वैद्यकीय उपचार घेत आहे किंवा त्याला अपंगत्व आलेले आहे असे जर काही नसेल तर या योजनेचा लाभ घेण्यासाठी पूर्व वैद्यकीय चाचण्यांची आवश्यकता नाही. ग्राहक त्रैमासिक किंवा अर्धवार्षिक हप्ते भरून ही विमा योजना खरेदी करू शकतात. विमा योजनेची मुदत १ वर्ष, २ वर्षे किंवा ३ वर्षे अशी आहे. 

मध्यावधी समावेश, बाह्यरुग्ण वैद्यकीय खर्च, आरोग्य तपासणी लाभ, सर्व प्रकारच्या एक दिवसीय वैद्यकीय उपचारासाठीचा खर्च, रस्ता आणि हवाई रुग्णवाहिका खर्च, रुग्णालयात दाखल होण्यापूर्वीचा आणि नंतरचा खर्च, अवयवदात्याचा खर्च, बेरिएट्रिक शस्त्रक्रिया, संचयी बोनस, पुनर्वसन आणि वेदना व्यवस्थापन खर्च, सेवा शुश्रुषा खर्च आणि घरातील उपचारांचा खर्च यासारख्या अनेक विशेष वैशिष्ट्यांचा लाभ या योजनेतून घेता येऊ शकेल.

नवीन विमा योजनेविषयी बोलताना स्टार हेल्थ अँड अलाईड इन्शुरन्स कंपनी लिमिटेडचे ​​व्यवस्थापकीय संचालक श्री आनंद रॉय म्हणाले, “विमाकर्ते म्हणून आम्ही वारंवार पाहिले आहे की वृद्धांच्या विमा गरजा सामान्यपणे पूर्ण होत नाहीत. या वयोगटातील ग्राहकांच्या खूप विशिष्ट गरजा असतात कारण तरुण प्रौढांपेक्षा रुग्णालयात भरती होण्याचे यांचे प्रमाण तुलनेने जास्त असते. हे लक्षात घेऊन आम्ही स्टार हेल्थ प्रीमियर विमा योजना तयार केली आहे. या योजनेमध्ये आता उपभोग्य वस्तूंचाही समावेश असून या विभागाला आता अधिक चांगले विमा संरक्षण पुरविले जात आहे. सततच्या रुग्णालयात भरती होण्यामुळे रुग्णावर पडणारा आर्थिक बोजाही कमी होण्यास मदत होत आहे. मला खात्री आहे की ही नाविन्यपूर्ण योजना अनेकांसाठी फायदेशीर ठरेल.”

स्टार हेल्थ प्रीमियर विमा योजनेची काही प्रमुख वैशिष्ट्ये:

·         १,00,00,000/- रुपयांपर्यंत रक्कम सम इन्श्युअर्ड; ग्राहक रु. १0,00,000/-, रु. २0,00,000/-, रु. ३0,00,000/-, रु. ५0,00,000/-, रु. ७५,00,000 आणि रु. १,00,00,000 पर्यतच्या विम्याची निवड करू शकतात

विमा संरक्षण– रुग्णालयात भरती केल्यावरचा उपचार खर्च, डे केअर उपचार, रस्ता आणि हवाई रुग्णवाहिका खर्च, रुग्णालयात दाखल होण्यापूर्वीचा आणि नंतरचा खर्च, अवयवदात्याचा खर्च

अतिरिक्त फायद्यांमध्ये आयुष उपचार, पुनर्वसन आणि वेदना व्यवस्थापन, बॅरिएट्रिक शस्त्रक्रिया, आधुनिक उपचारांसाठी संरक्षण खर्च, घरातील उपचार, सेवा शुश्रुषा, वैद्यकीय आणि टेली-आरोग्य सल्लामसलत यांचा समावेश आहे. पहिल्या दिवसापासून बाह्यरुग्ण वैद्यकीय खर्च संरक्षण.

विम्याच्या रकमेचा आंशिक किंवा पूर्ण वापर केल्यावर १००% ने मूळ विम्याची रक्कम आपोआप पुनर्संचयित होते.

दीर्घकालीन सवलत २ वर्षांच्या विमा योजनेसाठी – दुसऱ्या वर्षाच्या प्रीमियमवर १०% सूट. ३ वर्षांच्या विमा योजनेसाठी दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्षाच्या प्रीमियमवर ११.२५% सूट –

विमा योजनेच्या फायद्यांमध्ये हे समाविष्ट आहे:

·         प्रत्येक क्लेम मुक्त वर्षामध्ये आरोग्य तपासणीचा लाभ

·         रुग्णालयात भरती करण्याआधीच्या खर्चात विमाधारक व्यक्ती रुग्णालयात दाखल होण्याआधीच्या ६० दिवसांपर्यंतचा खर्च समाविष्ट

·         रुग्णालयात भरती होऊन घरी सोडल्यावर होणाऱ्या खर्चात विमाधारक व्यक्तीला रुग्णालयातून घरी सोडल्यावर पुढील ९० दिवसांसाठीचा खर्च समाविष्ट

·         प्रत्येक क्लेम-मुक्त वर्षासाठी मूळ विम्याच्या रकमेच्या कमाल १००% पर्यंत कालबाह्य होणार्‍या विम्याच्या रकमेच्या २०% चा संचयी बोनस

·         विम्याच्या रकमेच्या १०% पर्यंत विशिष्ट परिस्थितीसाठी कमाल रु. ५ लाखांपर्यंत घरगुती उपचारांसाठीचा खर्च समाविष्ट

·         सेवा शुश्रुषा उपचार: आमच्या नेटवर्क सुविधेवर लाभ घेतल्यास, प्रत्येक विमाधारक व्यक्तीसाठी आयुष्यात एकदा देय असे जास्तीत जास्त रु. ५ लाखांपर्यंत विम्याच्या रकमेच्या १०% पर्यंत देय.

·         डोमिसिलरी हॉस्पिटलायझेशन: एखाद्या आजार/आजार/दुखापतीसाठी, ज्यासाठी सामान्य स्थितीत, रूग्णालयामध्ये काळजी आणि उपचार आवश्यक असतात परंतु उपचार करणाऱ्या वैद्यकीय व्यावसायिकाच्या सल्ल्यानुसार जे उपचार घरात घेतले जातात अशा तीन दिवसांपेक्षा जास्त कालावधीसाठी असलेल्या वैद्यकीय उपचारांसाठी (आयुषसह) विमा संरक्षण

·         आयुष उपचार खर्च संरक्षण- यात विम्याच्या रकमेपर्यंत रुग्णालयात भरती झाल्यावरचा खर्च आणि डे केअर उपचार खर्च

·         गैर-वैद्यकीय उपभोग्य वस्तू जसे की हातमोजे, अन्न शुल्क आणि इतर उपभोग्य वस्तू यांचा खर्च समाविष्ट

·         आधुनिक उपचारांसाठी विम्याच्या रकमेच्या ५०% पर्यंतचे संरक्षण एकतर रूग्ण म्हणून किंवा हॉस्पिटलमधील डे केअर उपचारांचा भाग म्हणून या योजनेतून मिळते

·         स्टार वेलनेस प्रोग्राम विविध वेलनेस उपक्रमांद्वारे विमाधारक व्यक्तीला प्रोत्साहन आणि बक्षीस देतो. विमाधारक व्यक्ती प्रीमियममध्ये सूट मिळवण्यासाठी वेलनेस रिवॉर्ड पॉइंट मिळवू शकते. हा वेलनेस प्रोग्राम स्टार वेलनेस प्लॅटफॉर्मद्वारे स्टार हेल्थ कस्टमर मोबाईल अॅप ‘स्टार पॉवर’ आणि ‘स्टार हेल्थ कस्टमर पोर्टल’ (डिजिटल प्लॅटफॉर्म) द्वारे ऑनलाइन कार्यान्वित केला जातो.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

‘आणीबाणीचे नायक आणि खलनायक’ या पुस्तकाचे विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते प्रकाशन

‘आणीबाणी’ चांगली की वाईट, या वादापेक्षा त्याकडे निरपेक्ष इतिहास...

“एच.डी.मांजरेकर उत्कृष्ट एन.सी.सी कॅडेट ट्रॉफी” वितरण कार्यक्रम संपन्न

मेजर एच.डी. मांजरेकरउत्कृष्ट एन.सी.सी.कॅडेट ट्रॉफी वितरणरक्तदान शिबिराचे आयोजन६१ रक्तदात्यांनी...

देशभक्तीपूर्ण वातावरणात ६४ वा गोवा मुक्ती दिन साजरा; मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडून राष्ट्रध्वजारोहण

‘ऑपरेशन विजय’, पिंटो व कुंकळ्ळी उठावांचा मुख्यमंत्र्यांकडून उल्लेख; पोलीस,...