इंडियन नॅशनल कॅन्सर रजिस्ट्रीनुसार प्रॉस्टेट कॅन्सर बाधित पुरुषांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. प्रामुख्याने ५० वर्षे वयानंतरच्या पुरुषांमध्ये हा कॅन्सर अाढळतो. हा कॅन्सर जगभरातील पुरुषांच्या मृत्यूचे दुसरे प्रमुख कारण ठरला आहे. आणि दुर्देवाची बाब म्हणजे प्रत्येक सहावा पुरुष प्राॅस्टेट कॅन्सर बाधीत आहे.
आज जगभरातील विकसीत देशांमध्ये डिजिटल रेक्टल एक्झामिनेशन (बोटाद्वारे गुद्वारतुन आणि पीएसएच्या) च्या माध्यमातून कॅन्सरबद्दल जागरूकता होत आहे मात्र भारतात प्राॅस्टेट कॅन्सरबाबत आज देखील तितकीशी जागरूकता नाही. जवळपास ६० टक्के रुग्ण डाॅक्टरला भेटतात जेव्हा ते शेवटच्या टप्यावर पोहचलेले असतात.
यासाठी इन्स्टिट्यूट फाॅर प्राॅस्टेट कॅन्सर (IPC) मागील ३ वर्षांपासून प्रॉस्टेट कॅन्सर आणि त्याचे निदान करण्यासाठी उपलब्ध अत्याधुनिक तंत्रज्ञानाबद्दल जागकृता निर्माण करण्यासाठी प्रयत्न करत आहे. यासाठी १०० पेक्षा अधिक शिबीरांच्या माध्यमातून २२,००० पेक्षा जास्त लोकांची जनजागृती केली.
कॅन्सरची प्राथमिक लक्षणे : वारंवार लघवी येणे, रात्री वारंवार लघवीला जावे लागणे, लघवीला त्रास होणे, लघवी पूर्ण होत नसल्याची जाणीव होणे ही आहेत. कॅन्सरच्या पूढील टप्यात हाडांमध्ये वेदना होणे, भूक कमी होणे याबरोबरच फ्रॅक्चर आणि अर्धांगवायूचा धोका देखील संभावतो. भविष्यात प्रॉस्टेट कॅन्सरचा धोका कमी करण्यासाठी ५० वर्षांपूढील पुरूषांनी पीएसए आणि डीआरई तपासणी करण्याचा सल्ला इन्स्टिट्यूट फाॅर प्रॉस्टेट कॅन्सरने दिला असून कोणत्याही प्रकारच्या पाठदूखीकडे दुर्लक्ष करू नये असे देखील सुचवले आहे.
जर वेळेत निदान झाले तर हा कर्करोग पूर्णपणे बरा होऊ शकतो. विशेषत: ५० वर्षे वयानंतर कोणत्याही पाठीच्या दुखण्याकडे दुर्लक्ष करू नका. पूर्व निदानद्वारे प्रॉस्टेट कॅन्सर असल्याचे कळाले तर बायोअप्सी करणे गरजेचे असते. बायोअप्सी ही एक साधी, सरळ पद्धत असून ही अल्ट्रासाउंड मशीनच्या मदतीने केली जाते. टीआरयुएस (ट्रान्स रेक्ट अल्ट्रासाउंड) च्या मदतीने केली जाणारी बायोअप्सी आदर्श बायोआॅप्सी समजली जाते. एमआरआयद्वारे कॅन्सरचा अधिक अचूक निदान होऊ शकते.
मोफत शिबीर- ३ ते १३ जुलै २०१७, पुर्व नियोजीत वेळेनुसार

