मुंबई – ज्यांना शिवसेनेतून काढून टाकले जाईल असे वाटत असलेले राज्याचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची शिवसेना नेते पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे.कालच शिंदे यांनी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती.आजच शिवसेना प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे मुख्यमंत्री नाहीत असे वक्तव्य केले होते, त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.तुम्ही पक्षविरोधी कारवाया करत आहात आणि स्वेच्छेने शिवसेनेचे सदस्यत्वही सोडले आहे. त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख म्हणून माझ्याकडे असलेल्या अधिकारांचा वापर करून मी तुम्हाला पक्ष संघटनेतील शिवसेना नेते पदावरून काढून टाकत आहे,असे पत्र उद्धव ठाकरेंनी प्रसिद्ध केले आहे.या पत्राची एक प्रत राष्ट्रीय कार्यकारिणीला देखील देण्यात आली आहे. यामुळे शिंदे गट जो आम्हीच शिवसेना असल्याचा दावा करत आहे, त्यांना धक्का बसला आहे. उद्धव ठाकरेंनी सकाळीच शिंदे सरकार हे शिवसेनेचे नसल्याचे म्हटले होते. शिंदे सरकारवर कुठेही शिवसेना आणि पक्षप्रमुखांचा पाठिंबा असल्याचा उल्लेख नाहीय, यामुळे हे शिवसेनेचे सरकार नाही, असे ते म्हणाले होते. उद्धव यांनी गुरुवारी, ३० जूनलाच ही कारवाई केली आहे.या राजकीय खेळीमुले शिंदे गटाला आता सेनेतून फुटून गट म्हणून मान्यता मिळवावी लागेल असे स्पष्ट दिसते आहे, तसे झाले नाही तर बंडखोरीची तलवार त्यांनाच अपत्रही ठरवू शकणार आहे याकडे लक्ष वेधले जाते आहे.
सेनेतून काढण्याऐवजी सीएम एकनाथ शिंदे यांची नेते पदावरुन हकालपट्टी
Date:

