प्रभाग विकासाचे मॉडेल राबविणार-स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने

Date:

पुणे, 12 -पुणेकरांना सर्वप्रकारच्या मूलभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी प्रभाग विकासाचे मॉडेल विकसित करण्यात आले असून प्रायोगिक तत्त्वावर उद्यापासून त्याची अंमबजावणी करण्यात येणार असल्याची माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
रासने म्हणाले, एक प्रभाग एक एकक मानून प्रभागाचा विकास करण्यात येणार आहे. त्यासाठी आयुक्त विक्रम कुमार यांच्यासह महापालिकेच्या सर्व विभागांचे अधिकारी प्रभाग क्रमांक 15 मधील विकासकामांची पाहाणी करणार आहेत. नागरिकांचे प्रश्न समजावून घेऊन त्यानुसार विकासकामांचे मॉडेल तयार केले जाणार आहे. या मॉडेलची नियोजनबध्द अंमलबावणी केली जाणार आहे. त्यानंतर महापालिकेच्या 42 प्रभागांमध्ये हे मॉडेल राबविण्यात येईल.
रासने पुढे म्हणाले, समान पाणी पुरवठा, रस्ते, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, मेट्रो, सांडपाणी व्यवस्थापन, घनकचरा व्यवस्थापन या पुणेकरांच्या मूलभूत गरजा आहेत. त्या पुरविण्यासाठी विविध खात्यांतर्गत समन्वयाची गरज असते. परंतु बहुतेकदा हा समन्वय नसल्याने एकाच ठिकाणी पुन्हा पुन्हा काम करावे लागते. त्यामुळे निधीचा अपव्यय तर होतोच पण सर्वसामान्य नागरिकांची गैरसोय होते.  प्रभाग विकासाच्या मॉडेल मध्ये या सर्व बाबींचा एकत्रित समावेश केला जाईल. त्यामुळे पुणेकरांना गुणवत्तापूर्ण मूलभूत सुविधा मिळू शकतील.
रासने पुढे म्हणाले, सर्वच प्रभागांमध्ये प्राधान्याने हेच मूलभूत प्रश्न आहेत. त्या सोडविण्यासाठी पुन्हा पुन्हा लोकप्रतिनिधी, प्रशासन, अधिकारी यांना वारंवार प्रकल्प भेटी कराव्या लागणार नाहीत. त्यामुळे वेळेची बचत होऊन गतीने विकासकामे मार्गी लागतील.
उद्या सकाळी साडेसात वाजता आयुक्त विक्रम कुमार यांच्या प्रमुख उपस्थितीत महात्मा फुले मंडई येथून हा उपक्रम सुरू होईल.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

बौद्ध धम्म हा मनःशांती ते विश्वशांती चा प्रतीक ~ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

बुद्धगया : भगवान गौतम बुद्धांनी आखिल मानवजातीच्या कल्याणासाठी...

नेपाळमध्ये बस महामार्गावरून नदीत कोसळली, 18 ठार:25 जखमी

काठमांडू:नेपाळमधील धादिंग जिल्ह्यात सोमवारी रात्री उशिरा एक बस महामार्गावरून...

हवामान विभागाचा 7 जिल्ह्यांना ‘येलो अलर्ट’,विदर्भात पावसाचा धुमाकूळ, तर कोकणात आंबा धोक्यात

मुंबई:रविवारी मध्यरात्रीपासून विदर्भातील नागपूर, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांत विजांच्या...