पणजी -गोव्यात विविध संघटनांनी पेट्रोल गैस , डीझेल च्या भरमसाठ किंमतीला भाजपा कारणीभूत असल्याचा आरोप करत ठीक ठिकाणी आंदोलने करण्यात आली .कॉंग्रेसचा त्यात मोठा सहभाग होता . पण आता राजकीय पक्षांनीच आंदोलने करण्या बरोबर जनतेनेही या आंदोलनात उतरावे असे सांगत अनेक संस्था संघटना पुढे येऊन नागरिकांना आवाहन करू लागल्याचे या निमित्ताने दिसले . आम्ही महागाईच्या भस्मासुराशी लढण्याचा निर्णय घेतला आहे. तुम्ही हि पुढे या . असे आवाहन यावेळी करण्यात आले.


