Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

‘कोरोना किलर ‘ इलेक्ट्रॉनिक उपकरणाची उद्योग मंत्र्यांकडून पाहणी

Date:

पुणे :
आयनायझेशन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून कोरोना सारख्या विषाणू चा नाश करणाऱ्या  ‘कोरोना किलर ‘ इलेक्ट्रॉनिक उपकरणाचे संशोधन सद्यस्थितीत महत्वाचे असून  रुग्णालये आणि औद्योगिक आस्थापनांमध्ये विषाणूनाशक यंत्रणा लावण्याचा प्रस्तावावर आम्ही गांभीर्याने विचार करीत आहोत ‘,असे राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी मंगळवारी सांगितले . 
पुण्यातील अभियंता आणि इंडोटेक इंडस्ट्रियल सोल्युशन्स प्रा .लि .चे संचालक भाऊसाहेब जंजिरे यांनी मुंबई येथे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची भेट घेऊन त्यांना या अभिनव संशोधनाची माहिती दिली आणि प्रात्यक्षिक दाखवले . आयसीएमआर ,राष्ट्रीय विषाणु संशोधन संस्था ,नायडू हॉस्पिटल यांनी ‘कोरोना किलर ‘ विषाणू नाशक   इलेक्ट्रॉनिक उपकरणाला दिलेली  कार्यक्षमता प्रमाणपत्र यावेळी उद्योग मंत्र्यांना देण्यात आली .    

उद्योगमंत्री सुभाष देसाई म्हणाले ,’हे इलेक्ट्रॉनिक उपकरण अत्यंत चांगल्या पद्धतीने काळाची गरज ओळखून तयार केलेले  आहे. आवश्यक परीक्षण संस्थांची प्रमाणपत्रे असल्याने   हे उपकरण सगळीकडे लावणे शक्य  आहे . ज्या हॉस्पिटलमध्ये कोविड -१९ चे रुग्ण  आहेत, त्या हॉस्पिटलमध्ये ,सेंटरमध्ये डिसन्फेक्ट करण्यासाठी हे उपकरण अत्यंत महत्त्वाचे  आहे आणि त्यासंदर्भात आरोग्य खात्याचे मंत्री  राजेश टोपे यांच्याशी बोलू . त्या प्रकारचा प्रस्ताव सादर करावा , औद्योगिक आस्थापनांमध्ये  हे मशीन लावण्यासाठी प्रयत्न केला जाईल. 
यावेळी ‘ फेडरेशन ऑफ ऑल इंडिया व्यापार मंडल  ‘ या संघटनेचे  महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष विजयसिंह डुबल उपस्थित होते

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

“त्या” विमान प्रवाश्यांना भरपाई दिलीच पाहिजे: मुंबई युवक काँग्रेसचे आंदोलन

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या T2 टर्मीनलवर घोषणाबाजी करत...

मद्यतस्करी :18 लाखाचा मुद्देमाल जप्त,3 गजाआड

पुणे :दारूची अवैध वाहतूक होत असल्याची माहिती ...

महावितरणचे संचालक राजेंद्र पवार ‘दिव्यांग भूषण 2025’ पुरस्काराने सन्मानित

नागपूर, दि. 9 डिसेंबर 2025: महावितरणमधील दिव्यांग अधिकारी आणि...