पुणे-युवा व नवोदित कलाकारांसाठी पुणे फेस्टीव्हलमध्ये दरवर्षी ‘इंद्रधनू’ या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. ३४व्या पुणे फेस्टिव्हलमध्ये बुधवार दि. ७ सप्टे. रोजी सायं. पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन, पुणे येथे झालेल्या इंद्रधनू कार्यक्रम संपन्न झाला. प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद यास मिळाला. यंदा या उपक्रमाचे २५वे वर्ष आहे. रवींद्र दुर्वे याचे संयोजन करीत आहे.
१६ ते 25 वर्षे वयोगटातील युवा कलाकारांना व्यासपीठ मिळवून देणाऱ्या या कार्यक्रमात यंदा २०० हून अधिक युवा कलाकारांनी सहभाग घेतला. शास्त्रीय गायन, शास्त्रीय नृत्यामध्ये ; कथक, भरतनाट्यम, मोहिनीअट्टम, कथकली, कुचीपुडी व ओडिसी नृत्य तसेच तबला, बासरी, हार्मोनियम, गिटार, व्हायोलीन, सतार, सरोद, कीबोर्ड वादन, सिंथेसायझर, गंधर्व गायन, नकला, एकपात्री प्रयोग, पोवाडे, भावगीत, भक्तीगीत, चित्रपट गीते, सुगम संगीत, पाश्चिमात्य नृत्य अशा वैविध्यपूर्ण कला प्रकारांनी सारे भवन भारून गेले होते. प्रारंभी इंद्रधनू कार्यक्रमाचे संयोजक रवींद्र दुर्वे यांनी सर्वांचे स्वागत केले व युवा कलाकारांना शुभेचा दिल्या आणि कौतुक केले.
पुणे फेस्टिव्हलचे मुख्यप्रायोजक कोहिनूर ग्रुप असून उपप्रायोजक जमनालाल बजाज फाउंडेशन, नॅशनल एग को-ऑर्डिनेशन कमिटी, सिस्का आणि सहप्रायोजक भारत फोर्ज व पंचशील आहेत. इंद्रधनूचे प्रयोजक मराठी बांधकाम व्यावसयिक संघटना व गेरा डेवलपमेंट प्रा.लि हे आहेत.