स्वदेशी बनावटीचे प्रगत हलके हेलिकॉप्टर एमके III स्क्वॉड्रन गुजरातमधील पोरबंदर येथे भारतीय तटरक्षक दलात तैनात

Date:

नवी दिल्‍ली, 28 जून 2022

835 स्क्वॉड्रन (CG) हे स्वदेशी बनावटीचे प्रगत हलके हेलिकॉप्टर (ALH) MK III स्क्वॉड्रन, 28 जून 2022 रोजी गुजरातमधील पोरबंदर येथील एअर एन्क्लेव्ह येथे भारतीय तटरक्षक दलात तैनात करण्यात आले. तटरक्षक दलाचे महासंचालक व्ही. एस. पठानिया यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या समारंभाला पोरबंदर आणि गुजरात परिसरातील विविध लष्करी अधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते. या स्क्वाड्रनचा तटरक्षक दलातला समावेश शोध आणि बचाव कार्य (SAR) तसेच सागरी देखरेख क्षेत्रात स्वयंपूर्णतेच्या दिशेने घेतलेली उत्तुंग भरारी असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘आत्मनिर्भर भारत’ या संकल्पनेला अनुरूप आहे.

ALH MK III हेलिकॉप्टरची निर्मिती हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडने (HAL) केली आहे. स्वदेशी बनावटीच्या या हेलिकॉप्टरमध्ये प्रगत रडार तसेच इलेक्ट्रो ऑप्टिकल सेन्सर्स, शक्ती इंजिन, संपूर्णपणे काचेचे कॉकपिट, उच्च-तीव्रतेचा सर्चलाइट, प्रगत संप्रेषण प्रणाली, स्वयंचलित ओळख प्रणाली तसेच SAR होमरसह अत्याधुनिक उपकरणे आहेत. यामुळे ते सागरी टेहळणी करू शकेल तसेच दिवसा आणि रात्री दोन्ही वेळी जहाजांवरील परिचालनादरम्यान विस्तारित अंतरावर शोध आणि बचाव कार्य हाती घेऊ शकेल. हेवी मशीन गन असलेल्या प्लॅटफॉर्म ऐवजी सौम्य प्लॅटफॉर्म म्हणून वापर करण्याची यात क्षमता असून यामुळे प्रकृती गंभीर असलेल्या आजारी रुग्णांना नेण्यासाठी आयसीयू युनिट देखील ते घेऊन जाऊ शकते.

आतापर्यंत, 13 ALH MK-III विमाने टप्प्याटप्प्याने भारतीय तटरक्षक दलात सामील करण्यात आली आहेत आणि यापैकी चार विमाने पोरबंदर येथे तैनात आहेत. सामील केल्यापासून, स्क्वॉड्रनने 1,200 तासांहून अधिक उड्डाण केले असून दीव किनार्‍यावर प्रथमच रात्रीच्या मदत आणि बचाव कार्यासह अनेक मोहिमा राबवल्या आहेत.

835 Sqn (CG) चे नेतृत्व कमांडंट सुनील दत्त यांच्याकडे आहे. या हेलिकॉप्टरच्या समावेशामुळे गुजरात प्रदेशात भारतीय तटरक्षक दलाच्या क्षमतेत मोठी भर पडेल आणि देशाची सागरी सुरक्षा आणखी मजबूत होईल.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

शरदचंद्र पवार सेंटर ऑफ एक्सलन्स इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ या अत्याधुनिक नूतन वास्तूचे उद्घाटन बारामतीत

बारामती: विद्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून साकारण्यात आलेल्या ‘शरदचंद्र पवार...

वार्षिक स्नेहसमेलनातून विद्यार्थ्यांच्या जीवनमूल्यांचा विकास.,,,, डॉ. काशिनाथ बांगर.

पुणे:शाळेतील स्नेहसंमेलन हा एक सांस्कृतिक कार्यक्रम असून विद्यार्थ्यांना कलाविष्कार...

भाजपा ज्येष्ठ नेते धनराज आसवानी यांचा राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश

पिंपरी, पुणे (दि. २७ डिसेंबर २०२५) पिंपरी चिंचवड शहरातील...

आंदेकर पुन्हा येणार ..उमेदवारी अर्ज भरायला ..आज अपूर्णच राहिले काम

पुणे-आयुष कोमकर हत्या प्रकरणातील आरोपी आणि आंदेकर टोळीचा म्होरक्या...