हौशी स्नूकर गटात भारत अव्वल स्थानी

Date:

  • दोहा, कतार येथील जागतिक व आशियाई स्नूकर स्पर्धेत पंकज अडवानी विजेता

पुणे, 22 सप्टेंबर 2021: सुमारे दोन वर्षांच्या कठीण कालखंडानंतर आंतरराष्ट्रीय सनुकर अजिंक्यपद स्पर्धेचे पुनरुज्जीवन झाले आणि जेमतेम एका आठवड्याच्या कालावधीत दोहा, कतार येथे पार पडलेल्या जागतिक आणि आशियाई स्नूकर अजिंक्यपद स्पर्धेत भारताचा सर्वोत्तम स्नूकर खेळाडू पंकज अडवानीने विजतेपद पटकावत आपल्या खात्यात 24 वे जागतिक सुवर्णपदक आणि आशियाई अजिंक्यपद स्पर्धा असे दोन बहुमान पटकावले. 

पंकज अडवानी जणू काही स्नूकरच्या स्पर्धा पुन्हा सुरू होण्याची वाटच पाहत होता आणि तसे घडताच हौशी स्नूकर गटात त्याने पुन्हा लक्षवेधी कामगिरी करत आपण अपराजित व अजिंक्यवीर असल्याचे दाखवून दिले.  
जागतिक सनुकर स्पर्धेच्या अंतिम फेरीत चुरशीच्या लढतीत पाकिस्तानचा बाबर मसिह याच्या विरुद्ध पंकज अडवानीने 7-5 असा अफलातून विजय मिळवला. सामन्यात 2-6 अश्या फरकाने पिछाडीवर असलेल्या बाबरने 5-6 असे पुनरागमन केले होते. परंतु पंकजने आपली आघाडी कायम ठेवत विजेतेपद पटकावले. तसेच, आशियाई सिक्स रेड स्नूकर स्पर्धेत पंकजने इराणच्या आमिर सरखोशचा 6-3 असा पराभव करून विजतेपदाला गवसणी घातली. त्याचे आशियाई स्पर्धेतील हे सलग दुसरे सुवर्णपदक असून याआधी 2019 मध्ये त्याने हि कामगिरी केली होती.  
बिलियर्ड्स(वेळ व गुण फॉरमॅट)च्या सर्व प्रकारात विजेतेपद पटकवणारा पंकज अडवानी हा जगातील एकमेव खेळाडू असून स्नूकर(१५रेड, १०रेड , सिक्स रेड आणि सांघिक स्नूकर) प्रकारात देखील त्याने विजेतेपद पटकावले आहे. बिलियर्ड्स व स्नूकर प्रकारात आतापर्यन्त 56 जागतिक विजेतेपद पटकावले असून हि आपल्या देशासाठी अभिमानाची बाब आहे.  1958मध्ये विल्सन जोन्सने जागतिक बिलियर्ड्स स्पर्धेत सुवर्णपदक, तर 1984 मध्ये ओ.बी. अगरवालने जागतिक स्नूकर स्पर्धेत विजेतेपद पटकावले होते. तसेच, 2012पासून अनेक स्नूकरपटूंनी पुरुष व महिला या दोन्ही गटात  28 जागतिक विजेतेपद पटकविले आहेत. यामध्ये  2019मध्ये लक्ष्मण रावतने जागतिक सिक्स रेड स्पर्धेत विजेतेपद पटकविले होते, तर 2015मध्ये जागतिक बिलियर्ड्स स्पर्धेत अरांता सांचेसने विजेतेपद आणि 2013मध्ये जागतिक सांघिक स्नूकर स्पर्धेत अरांताने विद्या पिल्लईच्या साथीत विजेतेपद पटकावले होते. याशिवाय, जागतिक ज्युनियर अजिंक्यपद स्पर्धेत तीन ज्युनियर खेळाडूंनी सुवर्णपदक पटकावले असून यामध्ये बिलियर्ड्समध्ये श्रीकृष्णा सूर्यनारायण व अनुपमा रामचंद्रन यांचा  तर, स्नूकरमध्ये कीर्थना पंडियनने यांचा समावेश होता.  
तसेच, याआधी मायकेल फेरेरा आणि गीत सेठी यांनी जागतिक बिलियर्ड्स स्पर्धेत अनेकवेळा विजेतेपद पटकावले आहे. याशिवाय भारतीय स्नूकरपटूंनी कांस्य व रजत पदकांची देखील कमाई करत क्रमवारीत देशाला अव्वल स्थानी पोहोचविले आहे. 

बिलियर्ड्स अँड स्नूकर संघटनेचे अध्यक्ष राजन खिंवसरा म्हणाले की, पंकज अडवानीला त्याच्या अभूतपूर्व यशाबद्दल मी त्याचे अभिनंदन करतो. क्यू क्रीडा क्षेत्राचा विकास करण्यासाठी आणि आणखी प्रोत्साहन वाढविण्यासाठी पंकजकडे अनेक योजना आहेत, ज्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर स्नूकरपटूंना त्यांची कामगिरी आणखी सुधारू शकण्यास मदत होणार आहे. प्रतिष्ठित अशा राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत सर्व राज्यांतुन 500 अधिक खेळाडू सहभागी होत असून  वर्षाच्या अखेरीस याचे नियोजन करण्यात येणार आहे. तसेच, बिलियर्ड्स आणि स्नूकर असोसिएशन ऑफ महाराष्ट्रचे राजन खिंवसरा अध्यक्ष आणि आंतरराष्ट्रीय बिलियर्ड्स आणि स्नूकर फेडरेशनचे सदस्यदेखील आहेत. 
 ते म्हणाले की, नजीकच्या भविष्यात स्नूकरचा समावेश ऑलिम्पिकमध्ये केला जाईल, अशी मला आशा  आहे आणि तसे झाल्यास आमचे स्नूकरपटू नक्कीच ऑलिंपिक पदक पटकावून पदकांच्या संख्येत वाढ करतील. 

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पुन्हा एकदा पुण्यात भाजपाला क्रमांक एकचा पक्ष म्हणून स्थान मिळवून देऊ : मुरलीधर मोहोळ

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘कॅन्टोन्मेंट’मधील भाजपा पदाधिकारी-कार्यकर्त्यांचा मेळावा ! कोरेगाव...

खंडोबाच्या जेजुरीत घडलं अघटीत..

मिरवणुकीत आगीचा भडका– २ नगरसेविका गंभीर भाजल्या, १८ जण...

सरकारच्या एक वर्षाच्या कामगिरीवर राज्यातील जनता समाधानी असल्याचे या निकालांवरून स्पष्ट… अजितदादा

महायुतीमधील मित्रपक्षांनी एकमेकांच्या इच्छुक उमेदवारांना पक्षप्रवेश द्यायचे नाहीत, असे...

वसुंधरा संरक्षणासाठी हजारो नागरिकांनी घेतलेली शपथ गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये

पुणे पुस्तक महोत्सवाच्या समारोपाला विश्वविक्रम पुणे: पुणे पुस्तक महोत्सवाच्या...