पुणे-समाजाला दिलेल्या सकारात्मक योगदानांची दखल घेण्याचा एक प्रयत्न म्हणून, लेक्झिकॉन एमआयएलई ही लेक्झिकॉन ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सची, फ्लॅगशिप पदव्युत्तर शिक्षणसंस्था सरकार, कायदा, सामाजिक कार्य, कॉर्पोरेट, शिक्षण आणि मनोरंजन या क्षेत्रातील दिग्गजांचा त्यांनी कला, धोरण यांसाठी दिलेल्या योगदानाबद्दल तसेच त्यांनी आपापल्या क्षेत्रात निर्माण केलेल्या प्रभावाबद्दल सन्मान करणार आहे. हा समारंभ महाराष्ट्राचे राज्यपाल श्री. भगतसिंह कोश्यारी यांच्या उपस्थितीत पुणे येथे १२ डिसेंबर, २०२० रोजी होणार आहे.
लेक्झिकॉन ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे अध्यक्ष पंकज शर्मा म्हणाले, “आपल्या उद्योगक्षेत्रांवर प्रभाव निर्माण करण्यासाठी लक्ष केंद्रित करणाऱ्या, सकारात्मक बदलाला चालना देणाऱ्या आणि नवोन्मेषाचे स्फुल्लिंग चेतवणाऱ्या उद्योगक्षेत्रातील नेत्यांसोबत संवाद साधण्याच्या, समन्वय करण्याच्या आणि त्यांची दखल घेण्याच्या आमच्या प्रयत्नांचा भाग म्हणून आम्ही भारत लीडरशिप अवॉर्डस् सुरू करण्याचा निर्णय केला. आमच्या विद्यार्थ्यांना दिग्गजांशी संवाद साधता यावा आणि त्यांच्या स्वत:च्या कारकिर्दीच्या मार्गात मापदंड तयार करता यावेत यासाठी आम्ही कायमच प्रयत्नशील असतो. विद्यार्थ्यांना स्वत:चा सर्वांगीण विकास साधण्यात मदत करता यावी म्हणून विविध दृष्टिकोनांचे दर्शन घडवणारे वातावरण तयार करण्यावर आमच्या अध्यापनशास्त्राने कायमच भर दिला आहे. या दिशेनेच एक पाऊल म्हणून हे पुरस्कार प्रदान करताना आम्हाला रोमांचित झाल्यासारखे वाटत आहे.“
लेक्झिकॉन ग्रुप्स ऑफ इन्स्टिट्यूटचे उपाध्यक्ष नीरज शर्मा म्हणाले,“लेक्झिकॉन एमआयएलई ही परिवर्तन करणारी व उद्योगक्षेत्राच्या चाकोऱ्या मोडणारी नवीन पिढी घडवण्याचे उद्दिष्ट समोर असलेली उदयोन्मुख पदव्युत्तर व्यवस्थापन शिक्षणसंस्था आहे. कोविडच्या साथीने आपल्या उद्योगांना तर उद्ध्वस्त केलेच, शिवाय व्यक्तीच्या वैयक्तिक उद्दिष्टांबद्दलच्या तसेच करिअरच्या निवडीबद्दलच्या मानसिकतेवरही आघात केला आहे. एक संस्था म्हणून आम्हाला एक नवीन विचारप्रक्रिया आत्मसात करणे तसेच शिक्षण व अनुभव देण्यासाठी स्वतंत्र असा दृष्टिकोन तयार करणे गरजेचे आहे. आमच्या डेटावर आधारित दृष्टिकोनासह, समस्या-निवारण आणि शून्यातून उद्योजक निर्माण करणारी विशेष कौशल्ये व क्षमता विद्यार्थ्यांना देण्यावर लक्ष केंद्रित करण्याचे लक्ष्य आमच्यापुढे आहे.”
विख्यात दिग्गजांसह या समारंभात, पिंकसारख्या चित्रपटांतून प्रभावी अभिनय करणारी बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू, दिग्दर्शक व प्रख्यात नृत्यदिग्दर्शक रेमो डिसोझा, यांचाही भारत लीडरशिप अवॉर्डने गौरव केला जाणार आहे.
या समारंभामध्ये “दि इंडिया ग्रोथ स्टोरी पोस्ट पॅण्डेमिक” या विषयावर चर्चासत्रही घेतले जाणार आहे. सरकारी तसेच कॉर्पोरेट क्षेत्रातील प्रख्यात व्यक्ती या चर्चेत भाग घेतील. संस्थेने हा समारंभ मर्यादित लोकांपुरता ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, सर्व संबंधितांना चर्चासत्रात सहभागी होता यावे या उद्देशाने कार्यक्रमाची लिंक उपलब्ध करून दिली जाईल. लेक्झिकॉन एमआयएलईला दृष्टिकोनांच्या आदानप्रदानासाठी व्यासपीठे उभी करायची आहेत तसेच भारताच्या वाढीच्या पुढील टप्प्याला चालना देणारे उपाय शोधून काढायचे आहेत.
पुरस्कारप्राप्त व्यक्तींची नावे
पुरस्कारप्राप्त व्यक्ती
लाइफटाइम अचीव्हमेंट भारत लीडरशिप अवॉर्ड्स
१. श्री. एस. डी. शर्मा
अध्यक्ष- लेक्झिकॉन ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स
२. डॉ. परवेझ ग्राण्ट
प्रमुख कार्डिओलॉजिस्ट आणि अध्यक्ष, कार्डिओव्हस्क्युलर सर्व्हिसेस तसेच पुणे येथील रुबी हॉल क्लिनिकचे व्यवस्थापकीय विश्वस्त
भारत लीडरशिप अवॉर्डस्
३. श्री. सौरभ राव (आयएएस)
विभागीय आयुक्त, पुणे
४. डॉ. दीपक म्हैसेकर (आयएएस)
माजी विभागीय आयुक्त
मुख्यमंत्र्यांचे सल्लागार
५. श्री. श्रावण हर्डीकर (आयएएस)
पालिका आयुक्त, पीसीएमसी
६. श्री. विशाल सोळंकी (आयएएस)
शिक्षण आयुक्त (महाराष्ट्र राज्य)
७. श्री. कृष्ण प्रकाश (आयपीएस)
पोलिस आयुक्त पीसीएमसी
८. श्री. रंजनकुमार शर्मा (आयपीएस)
डीआयजी, सीआयडी क्राइम पुणे
९. श्री. रामनाथन सुब्रमणियम
संचालक, महाराष्ट्र मेट्रो रेल प्रायव्हेट लिमिटेड
१०. श्री. वेदप्रकाश शर्मा
समुदाय विकास आणि समाजसेवा, पुणे
११. श्रीमती कविता द्विवेदी (आयएएस)
पीएमआरडीए
१२. श्रीमती तापसी पन्नू
भारतीय अभिनेत्री
१३. श्री. चंद्रकांत वामनराव काळे
अध्यक्ष, वाई अर्बन कोऑपरेटिव बँक लिमिटेड, वाई
१४. श्री. नेविल श्रॉफ
मॅनेजिंग पार्टनर, माझदा केमिकल्स
१५. श्री. शशांक भूषण
इंडिया साइट हेड आणि व्हीपी- एचआर, बीएमसी सॉफ्टवेअर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड
कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीसाठी भारत लीडरशिप अवॉर्डस्
१६. श्री. कार्तिक आनंद
संस्थापक आणि अध्यक्ष, एक्सडीबीएस कॉर्पोरेशन
१७. श्री. कुंदन देशमुख
व्यवस्थापकीय संचालक, परभणी अॅग्रोटेक प्रायव्हेट लिमिटेड
१८. श्री. संदीप खंडेलवाल
व्यवस्थापकीय संचालक, संदीप स्टील्स
१९. श्री. विवेक बिडगर
सोशल आँत्रप्रेन्युर
२०. श्री. रोहन सिंग
संस्थापक- ट्रस्टफोर्ट इव्हेंट अँड ट्रस्टमाइस
२१. श्री. विजय अडवाणी
संस्थापक- अडवाणी अॅडव्हर्टायजिंग
२२. स्वस्तिक सिर्सीकर
विश्वस्त- पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कम्प्युटर टेक्नोलॉजी, पीआयसीटी मॉडेल स्कूल, उपाध्यक्ष- लक्ष्य स्पोर्टस्, कॅप्टन- पूना क्लब गोल्फ कोर्स
२३. प्रमोद माणिकचंद दुग्गड
सामाजिक प्रभाव
२४. गौरव दुग्गड
उदयोन्मुख आंत्रप्रेन्युर
२५. प्रवीण सिंग
२६. रेमो डिसोझा
दिग्दर्शक/नृत्यदिग्दर्शक

