पूल-ए च्या तिसऱ्या सामन्यात भारताने स्पेनला 3-0 ने पराभूत

Date:

टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकी संघ पुन्हा ट्रॅकवर येताना दिसत आहे. रविवारी ऑस्ट्रेलियाविरुद्ध 1-7 असा पराभवाचा सामना करणाऱ्या भारतीय संघाने मंगळवारी पूल ए सामन्यात स्पेनला 3-0 ने पराभूत केले. या विजयामुळे भारताची उपांत्यपूर्व फेरी गाठण्याची शक्यता बळकट झाली आहे. टीम इंडिया 3 सामन्यांमध्ये 4 गुण मिळवून पूल-एमध्ये दुसर्‍या स्थानावर पोचोचली आहे. ऑस्ट्रेलिया अव्वल स्थानी आहे.

पहिल्या क्वार्टरमध्ये 2 गोल
पहिल्या क्वार्टरमध्येच भारताने २-० अशी आघाडी घेतली. सामन्याच्या 14 व्या मिनिटाला सिमरनजितसिंगने फिल्ड गोल्डच्या माध्यमातून भारताला 1-0 ने आघाडी मिळवून दिली. दुसर्‍याच मिनिटात रूपिंदर पाल सिंगने पेनल्टी स्ट्रोकवर गोल करत भारताची आघाडी २-० ने वाढवली दुसर्‍या व तिसर्‍या क्वार्टरमध्ये कोणताही संघ गोल करू शकला नाही. चौथ्या फेरीत रुपिंदर पाल सिंगने पेनल्टी कॉर्नरवर गोल नोंदवत भारताला 3-० अशी निर्णायक आघाडी मिळवून दिली.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

बौद्ध धम्म हा मनःशांती ते विश्वशांती चा प्रतीक ~ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

बुद्धगया : भगवान गौतम बुद्धांनी आखिल मानवजातीच्या कल्याणासाठी...

नेपाळमध्ये बस महामार्गावरून नदीत कोसळली, 18 ठार:25 जखमी

काठमांडू:नेपाळमधील धादिंग जिल्ह्यात सोमवारी रात्री उशिरा एक बस महामार्गावरून...

हवामान विभागाचा 7 जिल्ह्यांना ‘येलो अलर्ट’,विदर्भात पावसाचा धुमाकूळ, तर कोकणात आंबा धोक्यात

मुंबई:रविवारी मध्यरात्रीपासून विदर्भातील नागपूर, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांत विजांच्या...