नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या २१ दिवसांच्या देशव्यापी लॉकडाऊनचा आजचा अखेरचा दिवस आहे. या दिवशी देशवासियांना संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी देशव्यापी लॉकडाऊन ३ मेपर्यंत कायम राहणार असल्याचं जाहीर केलंय. करोना हॉटस्पॉट वाढले नाही तर नियम शिथील करण्यात येतील, असा दिलासाही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांना दिलाय. २० एप्रिलपर्यंत प्रत्येक प्रदेशाचं मूल्यांकन केलं जाणार आहे. जे प्रदेश करोनावर नियंत्रण मिळवण्यात यशस्वी होतील तिथले नियम शिथील केले जातील, असंही त्यांनी म्हटलंय. करोनाला कोणत्याही परिस्थितीत नवीन ठिकाणी वाढू द्यायचं नाही. स्थानिक स्तरावर एकही रुग्ण वाढला किंवा करोना रुग्णाचा मृत्यू झाला तर ही आपल्यासाठी चिंतेचा विषय ठरू शकतो. त्यामुळे आपल्याला करोना हॉटस्पॉटवर नियंत्रण ठेवण्यासाठी सतर्कता ठेवायलाच हवी. ज्या ठिकाणीही रुग्णांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलंय.
लॉकडाऊनच्या कालावधीत ३ मेपर्यंत वाढ : नरेंद्र मोदी (व्हिडीओ)
Date:

