डिजिटल व्यवहारांसह भारतातील आर्थिक सायबरगुन्हे व आयडेंटिटी थेफ्टमध्येही वाढ-एफआयएस पेस रिपोर्टचा निष्कर्ष

Date:

महत्त्वाचे निष्कर्ष · आर्थिक घोटाळ्यांचा अनुभव :वार्षिक दुपटीने वाढून 37 टक्के झाल्याचे 2019 एफआयएस पेस अहवालात आढळले

·  27-37 वर्षे वयोगटातील निम्म्या ग्राहकांनी गेल्या वर्षी घोटाळ्याचा अनुभव घेतला

·   गेल्या वर्षी घोटाळ्यांचे बळी ठरलेले 96 टक्के ग्राहक नुकतेच मोबाइल अॅप्सकडे वळले होते

नवी दिल्ली : एफआयएस™ (NYSE: एफआयएस) या वित्तीय सेवा तंत्रज्ञानातील आघाडीच्या कंपनीने आज जाहीर केलेल्या नव्या संशोधनामध्ये, गेल्या वर्षापासून आर्थिक घोटाळे लक्षणीय वाढले असल्याचे व त्यांचा बळी ठरणाऱ्यांचे प्रमाण दुपटीने, म्हणजे 37 टक्क्यांपर्यंत वाढल्याचे, तसेच सर्व वयोगटातील ग्राहक घोटाळेखोरांच्या जाळ्यात अडकत असल्याचे निदर्शनात आले आहे. 27 ते 37 वर्षे वयोगटातील व्यक्तींना अन्य वयोगटाच्या तुलनेत आर्थिक घोटाळ्यांचा अधिक फटका बसला आहे.

भारतीयांनी डिजिटल व्यवहार स्वीकारले आहेत, परंतु सोशल इंजिनीअरिंग व फिशिंग ईमेल मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याने, वैयक्तिक माहिती देण्याबाबत काय पथ्ये पाळावीत, हे अद्याप त्यांच्या लक्षात यायचे आहे, असेएफआयएसच्या पाचव्या वार्षिक पेस अहवालात स्पष्ट झाले आहे.

भारतात मोबाइल अॅप्स, डिजिटल पेमेंटचा वढता स्वीकार आणि आर्थिक घोटाळ्यांचे वाढते प्रमाण, यांचा कमालीचा सहसंबंध आहे. गेल्या वर्षात आर्थिक घोटाळ्यांचा फटका बसलेले 96 टक्के भारतीय ग्राहक पेमेंट करण्यासाठी नुकतेच रोख रकमेकडून मोबाइल अॅप व डिजिटल पेमेंटकडे वळले होते. यामुळे देशाच्या आर्थिक एकात्मिकरणाच्या प्रयत्नांवर लक्षणीय परिणाम होतो.

सध्याच्या डिजिटल बँकिंग क्षेत्रात, बँकांनी सुरक्षा, घोटाळे रोखणे व ग्राहक शिक्षण यासाठी गुंतवणुकीचे प्रमाण वाढवणे आवश्यक आहे. यामुळे विश्वासार्हता वाढण्यासाठीही मदत होईल आणि ग्राहक बँकिंग करत असताना यास सर्वाधिक प्राधान्य देत आहेत. ग्राहकांनी त्यांच्या बँकेवर ठेवलेला विश्वास केवळ भावना नसून, तो विविध अपेक्षांवर आधारित असणारा निर्णय असतो. परंतु, बँकांनी व्यवहार सुरक्षित होण्यावर, घोटाळे रोखण्यावर व वैयक्तिक माहिती गुप्त राखण्यावर भर दिला तरच त्या ग्राहकांचा विश्वास संपादित करू शकतील,” से भारतातील एफआयएसटे व्यवस्थापकीय संचालक रामस्वामी व्येंकटचलम यांनी सांगितले.

 अहवालातील अन्य ठळक निष्कर्ष पुढीलप्रमाणे आहेत:

-मोबाइल अॅप्समुळे वापर व नावीन्य यांना चालना

वैयक्तिक स्वरूपाची सेवा देण्यासाठी व ग्राहकांना सहभागी करून घेण्यासाठी बँकेच्या शाखा हे आता एकमेव माध्यम राहिलेले नाही. मोबाइल अॅप्स अते अनेक बँकांचा डिजिटल “चेहरा” ठरू लागले आहेत आणि आता विक्रमी 41 टक्के व्यवहार मोबाइलद्वारे केले जातात. बँकिंग सेवांसाठी सर्व वयोगटांमध्ये मोबाइलचा वापर केला जातो. आगामी काळाचा विचार करता, बँकांनी पासवर्ड-मुक्त व बायोमेट्रिक-आधारित, व्हॉइस बँकिंग व वॉलेट बँकिंग सुरू करावे, अशी भारतीय ग्राहकांची अपेक्षा आहे. 10 पैकी 9 भारतीय ग्राहकांना त्यांच्या पीएफआयद्वारे सोशल मीडियामध्ये सहभागी होण्याची इच्छा असते.

  मोबाइल पेमेंट आता अधिक लोकप्रिय

पैसे देण्यासाठी रोख रक्कम व कार्ड यांना अजूनही पसंती दिली जात असली तरी मोबाइल पेमेंटचे प्रमाण झपाट्याने वाढते आहे, प्रामुख्याने बँकांचे मुख्य ग्राहक असणाऱ्या तरुण वर्गामध्ये ते अधिक दिसून येते. मोबाइल पेमेंट अवलंबण्याच्या बाबतीत भारताने अमेरिका, यूके व जर्मनी यांना बरेच मागे टाकले आहे. सोय व युजर-फ्रेंडली इंटरफेस, तसेच सातत्याने सुधारणारी, कमी खर्चिक मोबाइल डाटा कनेक्टिविटी व मर्चंटकडून स्वीकार यामुळे मोबाइल पेमेंटची लोकप्रियता वाढते आहे. कॅश बॅक व अन्य सवलती देणाऱ्या मोबाइल वॉलेटचे अवलंब करण्याचे प्रमाणही वाढते आहे. मर्चंटसाठी यूपीआय 2.0 वरदान ठरत आहे, कारण त्यामुळे ओव्हरड्रीफ्ट अकाउंट व पेमेंटपूर्ण इनव्हॉइसचे व्हेरिफिकेशन या बाबतीत मदत होत आहे, लहाम व मध्यम कंपन्यांच्या श्रेणीमध्येही मोबाइल पेमेंट पसंतीची ठरू लागली आहेत.

   ग्राहकांच्या समाधानाच्या बाबतीत सार्वजनिक बँका आघाडीवर

आघाडीच्या 50 बँका व खासगी बँकांचे ग्राहक 2018 च्या तुलनेत कमी समाधानी होते. परंतु, साधारणतः संथपणे प्रतिसाद देणाऱ्या समजल्या जाणाऱ्या सार्वजनिक बँकांनी खराब कामगिरी करणाऱ्या ते उत्कृष्ट अशी झेप घेत,“अत्यंत समाधानी” ग्राहक हा टप्पा साध्य केला. नावीन्य हे विशिष्ट बँकांपुरते मर्यादित नाही, हे स्पष्ट आहे. अंदाजे 28 टक्के तरुण वर्ग (18-26) व 35 टक्के वयस्क ग्राहक (53+) त्यांच्या बँकांबाबत समाधानी नाहीत.

एफआयएसविषयी

एफआयएस वित्तीय सेवा तंत्रज्ञानातील जागतिक स्तरावरील आघाडीची कंपनी असून ती रिटेल व संस्थात्मक बँकिंग, पेमेंट, संपत्ती व मालमत्ता व्यवस्थापन, जोखीम व अनुपालन आणि आउटसोर्सिंग सोल्यूशन यावर भर देते. आमच्या सर्व सेवा, जागतिक क्षमता व डोमेनमधील कौशल्य याद्वारे एफआयएस 130 हून अधिक देशांतील20,000 हून अधिक ग्राहकांना सेवा देते. जॅक्सनव्हिले येथे मुख्यालय असणाऱ्या एफआयएसचे जगभर 47,000कर्मचारी आहेत आणि कंपनी पेमेंट प्रोसेसिंग, फायनान्शिअल सॉफ्टवेअर व बँकिंग सोल्यूशन यामध्ये आघाडीच्या स्थानी आहे. वित्तीय क्षेत्राला सबल करेल, असे तंत्रज्ञानाचे आउटसोर्सिंग, सॉफ्टवेअर व सेवा देणारी एफआयएस ही फोर्च्युन 500 कंपनी आहे आणि स्टँडर्ड अँड पोरच्या 500® निर्देशांकाची सदस्य आहे

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

‘आणीबाणीचे नायक आणि खलनायक’ या पुस्तकाचे विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते प्रकाशन

‘आणीबाणी’ चांगली की वाईट, या वादापेक्षा त्याकडे निरपेक्ष इतिहास...

“एच.डी.मांजरेकर उत्कृष्ट एन.सी.सी कॅडेट ट्रॉफी” वितरण कार्यक्रम संपन्न

मेजर एच.डी. मांजरेकरउत्कृष्ट एन.सी.सी.कॅडेट ट्रॉफी वितरणरक्तदान शिबिराचे आयोजन६१ रक्तदात्यांनी...

देशभक्तीपूर्ण वातावरणात ६४ वा गोवा मुक्ती दिन साजरा; मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडून राष्ट्रध्वजारोहण

‘ऑपरेशन विजय’, पिंटो व कुंकळ्ळी उठावांचा मुख्यमंत्र्यांकडून उल्लेख; पोलीस,...