पुणे-३४ व्या पुणे फेस्टिव्हलच्या श्रींची प्रतिष्ठापना आज बुधवार दि. ३१ ऑगस्ट रोजी सकाळी १०.०० वाजता हॉटेल सारस, नेहरू स्टेडियम येथे पुण्याचे सहपोलीस आयुक्त श्री. संदीप कर्णिक व सौ. प्रिया संदीप कर्णिक यांच्या हस्ते विधिवत संपन्न झाली. याप्रसंगी अभिनेत्री मानसी नाईक उपस्थित होत्या. पुणे फेस्टिव्हलचे अध्यक्ष सुरेश कलमाडी यांनी सर्वांचे स्वागत केले. या प्रसंगी उपाध्यक्ष कृष्णकुमार गोयल, मुख्य संयोजक डॉ. सतीश देसाई, यांसबरोबर रमेश बागवे, ऍड. अभय छाजेड, काका धर्मावत, मानसी नाईकचे पती प्रदीप खरेरा आणि वडील डॉ. राजन नाईक उपस्थित होते .
तसेच पुणे फेस्टिव्हलचे विविध समितीयांचे समन्वयक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यामध्ये रविंद्र दुर्वे, प्रसन्न गोखले, सुप्रिया ताम्हाणे, अनुराधा भारती, दीपाली पांढरे, तेजश्री अडीगे, श्रीकांत कांबळे, अतुल गोंजारी, बाळासाहेब अमराळे, रमेश भांड, सचिन साळुंके, श्रुती तिवारी, तन्मयी मेहेंदळे, सचिन खवले, नामदेव चाळके, विजय शेटे, सागर बाबर, अलका पाटील, अहमद शेख, सुभाष सुर्वे आदी यावेळी उपस्थित होते. वेदमूर्ती पं. धनंजय घाटे गुरूजी यांनी याचे पौराहित्य केले. पुणे फेस्टिव्हलच्या श्रींची प्रतिष्ठापना हॉटेल सारस येथील हॉलमध्ये करण्यात आली आहे. तेथे आकर्षक सजावट करण्यात आली आहे.